सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून देशभरात शंखनाद करून शासकीय आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त !

संबळ, मृदुंग, तुतारी आणि घंटा या सात्त्विक वाद्यांचाही नाद

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर कृतज्ञता व्यक्त करणारे साधक

मुंबई – पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या विरोधात ‘स्वतःचा जीव धोक्यात घालून लढा देत असलेल्या आपत्कालीन यत्रंणेत सहभागी असलेल्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायकांळी ५ वाजता नागरिकांनी स्वतःच्या घरात थांबून ‘टाळ्या वाजवणे’, ‘घंटानाद करणे’ आदी कृती करा’, असे आवाहन केले होते. या आवाहनाला गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक यांसह देशभरातील विविध राज्यांत सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही कृतीशील प्रतिसाद देत कृतज्ञता व्यक्त केली. सायंकाळी ५ वाजता साधक आणि कार्यकर्ते यांनी देशभरातील अनेक ठिकाणी शंखनादासह संबळ, मृदुंग, तुतारी आणि घंटा या सात्त्विक वाद्यांचा नाद केला.

 

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातन
आश्रमांच्या प्रवेशद्वारावर उभे राहून साधकांनी व्यक्त केली कृतज्ञता !

रामनाथी (गोवा) – ‘कोरोनाविरुद्धच्या लढाईत सनातन संस्था नेहमीच शासनाच्या समवेत आहे’, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारावर साधकांनी उभे राहून आपत्कालीन यंत्रणेत सहभागी असलेल्यांविषयी कृतज्ञता म्हणून शंखनादासह संबळ, मृदुंग आणि घंटा या सात्त्विक वाद्यांचा नाद करण्यात आला.

सनातनच्या देवद येथील आश्रमाच्या प्रवेशद्वारावर साधकांनी शंखनाद करून आणि कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment