मुलुंड येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

मुंबई – मुलुंड पूर्व येथील नानेपाडा श्री शिवगणेश मंदिरात ७ मार्च या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी उपस्थित जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा ७५ जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी साधनेविषयी मार्गदर्शन करणारे फ्लेक्स प्रदर्शन, तसेच सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचाही जिज्ञासूंनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे श्री. राजेंद्रप्रसाद भोगले यांनी केले. या प्रवचनाला नानेपाडा श्री शिवगणेश मंदिराचे अध्यक्ष श्री. मधुकर म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment