शिवरायांचे स्मरण शिवजयंतीपुरते मर्यादित न रहाता नित्य व्हायला हवे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

भांडुप आणि काळाचौकी येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम

मुंबई – शिवजयंती दिनांकाप्रमाणे कि तिथीप्रमाणे ? याचा आज वाद होतो; मात्र शिवरायांचा इतिहास अगणित पराक्रमांनी ठासून भरलेला असून प्रतिदिन शिवजयंती साजरी केली, तरी वर्षाचे दिवस कमी पडतील; असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी येथे केले.

भांडुप येथील गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवात त्या बोलत होत्या. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या व्याख्यानाला परिसरातील १२५ शिवप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात