परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले आणि सूक्ष्मातील जाणणारे उडुपी (कर्नाटक ) येथील संत उदयानंद स्वामी यांची सनातनच्या देवद (पनवेल ) येथील आश्रमाला भेट !

उडुपी (कर्नाटक) येथील संत उदयानंद स्वामी यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. श्री. ओंकार कापशीकर यांनी स्वामीजींना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य, तसेच सेवा यांविषयी अवगत केले.

संत उदयानंद स्वामी (उजवीकडे) यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना श्री. ओंकार कापशीकर

 

परिचय

संत उदयानंद स्वामी हे नित्यानंद स्वामीजी यांचे शिष्य आहेत. त्यांंचे मूळ नाव ‘श्री पद्मनाभस्वामी’ असे आहे. वास्तूशास्त्र, संख्याशास्त्र, आयुर्वेद आणि संगीतशास्त्र आदी विषयांवर त्यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळते.

१. संत उदयानंद स्वामी यांचा संतांप्रतीचा भाव

स्वामीजी म्हणाले, ‘‘आश्रमातील सर्व संतांना गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) घडवले आहे. येथील संतांना भेटून आनंद झाला.’’ या वेळी गुरुदेव आणि संत यांच्याप्रतीचा भाव स्वामीजींच्या तोंडवळ्यावर दिसत होता.

२. स्वामीजी यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

‘साधकांचे शारीरिक त्रास गुरुदेवांनी स्वतःवर घेतले आहेत. त्यामुळे साधकांना त्या त्रासांची तीव्रता अल्प जाणवते. गुरुदेवांमुळेच आपण साधना करू शकत आहोत’, असे भावोद्गार स्वामीजींनी काढले. ‘गुरुदेवांनी एकेका साधकाला कसे सिद्ध केले आहे, हे शिकण्यासाठी मी येथे आलो आहे. मी लहान मूल आहे’, असे ते पुनःपुन्हा म्हणत होते. (‘ते प्रत्येकाकडून शिकत आहेत’, असे त्यांच्या वागण्यातून जाणवत होते.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment