चेन्नई येथील ‘हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२०’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

डावीकडून श्री. सतीश, श्री. काशीनाथ शेट्टी, श्री. प्रभाकरन्, श्री. अर्जुन संपथ, पू. (सौ.) उमा रविचंद्रन आणि सौ. सुगंधी जयकुमार

चेन्नई (तमिळनाडू) – येथील वेलाचेरी भागातील गुरुनानक महाविद्यालयामध्ये ११ वा हिंदू आध्यात्मिक सेवा मेळा २०२० पार पडला. या मेळ्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. या वेळी सनातन संस्थेकडून कक्ष लावण्यात आले होते. कक्षांना भेट देणार्‍यांपैकी काही जणांनी सत्संगामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या कक्षांना अनेक मान्यवरांनीही सदिच्छा भेट दिली. ‘हिंदु मक्कल कच्छी’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, रामकृष्ण मठाचे स्वामीजी आदींचा यामध्ये समावेश होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment