समाजावरील आघात रोखण्यासाठी छत्रपतींप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना आवश्यक ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

मुंबई – मोगलाईत मंदिरे, महिला, गोमाता आणि हिंदु समाज यांच्यावर अनन्वित अत्याचार होत होते. हे सर्व थांबण्यासाठी मोगल साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न माता जिजाऊंनी पाहिले. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बाल शिवबावर ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज वृद्धींगत होईल, असे संस्कार केले. पुढे छत्रपती शिवरायांनी मावळ्यांसह प्रयत्नांची पराकाष्ठा करून हिंदवी स्वराज्य निर्माण करून जनतेला अन्यायापासून मुक्त केले. आजच्या परिस्थितीतही हिंदु धर्म, मंदिरे, महिला, गोमाता आणि हिंदु समाज यांवर आघात होत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना. ते सत्यात उतरवण्यासाठी आज प्रत्येक घराघरात माता जिजाऊ असायला हवी, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. चेंबूर येथील संत गाडगे महाराज सेवा सोसायटी येथे शिवजयंती उत्सवात सौ. नयना भगत बोलत होत्या. या वेळी वसाहतीतील लहान-थोर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment