हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संकल्पित ५ प्रत्यंगिरा याग पूर्ण !

प.पू. दास महाराज यांचे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांच्या आज्ञेनुसार यागांचे आयोजन

रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १४ जानेवारी या दिवशी चौथा, तर ७ फेब्रुवारी या दिवशी पाचवा प्रत्यंगिरा याग पार पडला. बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांना त्यांचे गुरु प.प. श्रीधरस्वामी यांनी स्वप्नदृष्टांताद्वारे सनातनच्या आश्रमात श्री प्रत्यंगिरादेवीचे ५ यज्ञ करण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी संकल्प केलेले ५ याग ७ फेब्रुवारी या दिवशी पूर्ण झाले. यज्ञाला प.पू. दास महाराज, सनातन संस्था आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन) यांचे संत यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात