सनातन संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यात साधना शिबिरे, तर कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साधना विषयावर मार्गदर्शन

अनेक वाचक, धर्मप्रेमी, जिज्ञासू यांची साधना जाणून घेऊन प्रत्यक्ष कृती करण्यास प्रारंभ

विश्रामबाग (सांगली) येथील साधना शिबिरात डावीकडून सौ. कल्पना थोरात, सौ. विद्या जाखोटिया आणि ‘मनाचे कार्य कसे चालते’, या विषयाचा फलक दाखवतांना साधक

सांगली – ‘सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी, जिज्ञासू यांच्यासाठी सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिरे घेण्यात आली. यात प्रामुख्याने साधना म्हणजे काय ?, नामजप कोणता करावा ?, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व, ती कशी राबवावी ?, दोष कसे शोधावेत यांसह अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात ‘साधना’ या विषयावर ठिकठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरे आणि मार्गदर्शन ऐकून अनेक ठिकाणी उपस्थित असलेले ‘सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी, जिज्ञासू यांनी साधना जाणून घेऊन प्रत्यक्ष कृती करण्यास प्रारंभ केला.

 

सांगली

१. रेठरेहरणाक्ष गावात घेण्यात आलेल्या शिबिरासाठी जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला.शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे आणि सनातन संस्थेच्या सौ. कल्पना थोरात यांनी मार्गदर्शन केले. शिबिरानंतर महिलांनी प्रत्येक आठवड्याला साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

२. विश्रामबाग येथील दांडेकर हॉल येथे साधना विषयावर शिबिर घेण्यात आले. सनातन संस्थेच्या सौ. कल्पना थोरात, तसेच सौ. विद्या जाखोटिया यांनी मार्गदर्शन केले. फलकाच्या माध्यमातून स्वभावदोष निर्मूलन संकल्पना स्पष्ट करून दाखवल्याने ती उपस्थितांना त्वरित समजली.

 

कोल्हापूर

१. कोल्हापूर शहरात सानेगुरुजी वसाहतीत सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी साधना विषयावर प्रवचन घेतले. प्रवचनाला ११० धर्मप्रेमी महिला उपस्थित होत्या. मासिक धर्मशिक्षणवर्गाची मागणी करण्यात आली.

२. मलकापूर येथील उचत येथील हनुमान मंदिरात धर्मप्रेमींसाठी प्रवचन घेण्यात आले. श्री. प्रसाद कुलकर्णी आणि सौ. सुनीता भोपळे यांनी मार्गदर्शन केले. हणमंतवाडी (मलकापूर-बांबवडे) येथील जोतिबा मंदिरात १०० पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. येथे हिंदुत्वनिष्ठ श्री. कृष्णात भाकरे यांनी उपस्थित ६० महिलांना संक्रांतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचा भेटसंच बनवून दिला. परळी येथील जोतिबा मंदिरात, तसेच सुपात्रे-बांबवडे येथे धर्मप्रेमींसाठी प्रवचन घेण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment