रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात मंगलमय वातावरणात झाली श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

सनातन संस्थेला लाभली श्री भवानीदेवीची कृपाशक्ती !

रामनाथी, गोवा – आदिशक्ती श्री भवानीदेवी ही भक्तांची रक्षणकर्ती आणि वरदायिनी आहे. तिच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपतींच्या स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना व्हावी, यासाठी हंगरहळ्ळी (तालुका कुणीगल, कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीच्या आज्ञेने येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात श्री भवानीदेवीची स्थापना करण्यात आली. १९ जानेवारी या दिवशी येथील सनातन आश्रमात तिचे शुभागमन झाले.

श्री भवानीदेवीच्या मूर्तीला दर्भ लावून तिची प्राणप्रतिष्ठापना करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

२१ जानेवारी या दिवशी सकाळी मंत्रघोषात श्री भवानीदेवीची मूर्ती आश्रम परिसरातील मंदिरात स्थापन करून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आत्यंतिक शारीरिक त्रास होत असतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले या वेळी उपस्थित होते. मंदिरात स्थापन केलेल्या मूर्तीवर त्यांनी अक्षता अर्पण केल्या.

स्थापनेनंतर तत्त्व होम, तत्त्व न्यास (श्री भवानीदेवीच्या मूर्तीमध्ये देवतांचे तत्त्व चढवण्याचा विधी) आदी विधी करण्यात आले. यानंतर श्री भवानीदेवीची मंगलारती करण्यात आली. पूर्णाहुतीने श्री भवानीदेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या भावसोहळ्याची सांगता झाली.

या वेळी पानवळ (बांदा) येथील संत प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांच्यासह सनातन संस्था आणि एस्.एस्.आर्.एफ्. (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन) यांचे संत अन् साधक या वेळी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment