तेलंगण आणि आंध्रप्रदेश येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाग्यनगर (तेलंगण) – भाग्यनगर येथे पार पडलेला ३३ वा हैद्राबाद पुस्तक मेळावा आणि विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे आयोजित ३१ वा विजयवाडा पुस्तक मेळावा यांमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सनातन संस्थेच्या वतीने सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या मेळाव्यात एकूण ३५० दुकाने लावण्यात आली होती आणि त्याला प्रतिदिन सहस्रो लोक भेट देत होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील सनातन संस्थेचे ग्रंथ, तसेच उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यात धर्मशिक्षण फलकही लावण्यात आले होते. सहस्रो जिज्ञासू प्रदर्शनस्थळी उभे राहून हे फलक वाचत होते. हे फलक वाचून जिज्ञासूंना धर्मशिक्षण मिळत होते. प्रदर्शनस्थळी सनातनच्या ग्रंथांची माहिती देणारे फलकही (बॅनरही) लावले होते. ते वाचून जिज्ञासू प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ खरेदी करत होते.

भाग्यनगरमध्ये पाश्‍चात्त्य पद्धतीने नववर्ष साजरे न करण्याविषयी प्रबोधनात्मक हस्तपत्रके वाटण्यात आली, तसेच ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणीही ही पत्रके वाटण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment