यवतमाळ येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाद्वारे अध्यात्मप्रसार

ग्रंथप्रदर्शन पाहतांना उजवीकडून दुसरे विजय बुंदेला आणि त्यांच्या शेजारी अमोल ढोणे

यवतमाळ – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेल्या राष्ट्र-धर्म, मराठी भाषासंवर्धन, साधना, आयुर्वेद, विकार निर्मूलन, स्वभावदोष-अहं निर्मूलन इत्यादी विविध विषयांवरील अनमोल ग्रंथांद्वारे लोकजागृती होऊन अध्यात्मप्रसार व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने स्थानिक दत्त चौक येथे १२ जानेवारीला फिरत्या धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘दैनिक दिव्य मराठी’चे जिल्हा प्रतिनिधी श्री. अमोल ढोणे आणि ‘दैनिक सिंहझेप’चे जिल्हा प्रतिनिधी श्री. विजय बुंदेला यांच्या हस्ते धर्मरथाचे पूजन करण्यात आले.

या वेळी सनातन संस्थेचे श्री. लोभेश्‍वर टोंगे यांनी मान्यवरांना ग्रंथ, तसेच सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने यांची माहिती दिली.

१४ ते १६ जानेवारी या दिवशी वणी येथील साई मंदिरासमोर हेच प्रदर्शन लागणार असून जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

क्षणचित्र

दैनिक नागपूर पोस्टचे श्री. अशोक बानोरे, तसेच दैनिक लोकमतचे पत्रकार श्री. रूपेश उत्तरवार यांनी धर्मरथाला भेट दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment