गुरूंचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असते ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी साधना शिबिर पार पडले

सौ. धनश्री केळशीकर यांचे मार्गदर्शन ऐकतांना जिज्ञासू

डोंबिवली – गुरूंचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असते. आपण गुरु करू शकत नाही, तर गुरूंनी शिष्य म्हणून आपल्याला स्वीकारायला हवे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी येथे आयोजित केलेल्या साधना शिबिरात केले. शिबिरात ‘साधना’ आणि ‘स्वभावदोष-अहं निर्मूलन’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मिठाच्या पाण्याचा वापर करून आध्यात्मिक उपाय कसे करावेत, यासंदर्भात ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. अशी साधना शिबिरे ठाणे जिल्ह्यात ठाणे शहर, कळवा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथेही झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment