सनातन-निर्मित ग्रंथ

प्रत्येक जिवाच्या आयुष्यातील दुःख दूर करणारे आणि त्याला
आनंदप्राप्तीचा मार्ग दाखवून ईश्वरापर्यंत घेऊन जाणारे सनातन-निर्मित ग्रंथ

सनातन-निर्मित ग्रंथ

सनातन-निर्मित ग्रंथ

सनातन-निर्मित ग्रंथ कलियुगामध्ये जिवाला ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी साहाय्य करणारे मार्गदर्शक आहेत. सनातनच्या ग्रंथात एक अद्भुत गोष्ट आहे आणि ती म्हणजे जिवाला ज्या विषयाची आवश्यकता असते किंवा त्याला ज्या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शनाची आवश्यकता असते, त्या विषयाचे ग्रंथ वाचण्याचे विचार देवच त्याच्या मनात घालतो. त्यामुळे जिवाला पुढील लाभ होतात.

१. त्याच्या मनात असणार्‍या सर्व शंका दूर होतात.

२. जीव ज्या स्थितीत असतो, त्याच्या पुढच्या स्थितीत जाण्यासाठी त्याला मार्गदर्शन मिळते.

३. प्रत्येक क्षेत्रात त्याला मार्गदर्शन मिळते आणि पुढची दिशा प्राप्त होते.

४. त्याचे दुःख दूर होऊन त्याला आनंदप्राप्तीचा मार्ग मिळतो.

५. त्याचे अज्ञान दूर होऊन तो परम ज्ञानी बनतो.

६. सनातनच्या ग्रंथांसमवेत ईश्वराचे अस्तित्वही सतत जाणवेल.

७. जिवाला आनंद आणि शांती यांची अनुभूती घेता येईल.

८. त्याच्यातील सात्त्विकता वाढून कालांतराने समाजही सात्त्विक बनेल. सर्वजण ईश्वराचेच चिंतन करतील.

९. प.पू. डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज सनातन-निर्मित ग्रंथांच्या माध्यमातून जिवाच्या समवेत सूक्ष्मातून सतत राहून त्याला मार्गदर्शन करत रहातील आणि कलियुगात भगवद्गीतेनंतर सनातन-निर्मित ग्रंथांना ‘धर्मग्रंथां’चे स्थान प्राप्त होईल.’

– श्रीकृष्ण (सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांच्या माध्यमातून, कार्तिक कृ. ३, कलियुग वर्ष ५११३(१३.११.२०११), रात्री ९.३०)

अन्य संस्थांचे धार्मिक ग्रंथ आणि सनातनचे ग्रंथ

अन्य संस्थांचे धार्मिक ग्रंथ सनातनचे ग्रंथ
१. विषय तात्त्विक प्रायोगिक
२. भाषा पारंपारिक वैज्ञानिक
३. ज्ञान उपलब्ध ग्रंथातील पृथ्वीवर आतापर्यंत उपलब्ध नसलेलेही
४. का आणि कसे ?, इत्यादींची उत्तरे नसणे असणे

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.३.२०१५)

Leave a Comment