शालेय शिक्षणामध्ये मानसिक आरोग्याला महत्त्व द्यावे

पहिल्या मानसिक आरोग्य परिषदेतील सूर

मुंबई – शाळेत प्रवेश मिळण्यापासूनच लहान मुलांमध्ये चढाओढीला आरंभ होतो. त्यानंतर विविध शिकवण्या, इतर विद्यार्थ्यांकडून होणारी चेष्टा, पालकांचे आपापसांतील वाद, त्यांचा घटस्फोट इत्यादी कारणांमुळे मुलांवर ताण येतो. तो हाताळण्यासाठी मुलांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवणे आवश्यक आहे. म्हणूनच शालेय शिक्षणामध्ये मानसिक आरोग्याला महत्त्व प्राप्त व्हावे, असा सूर मानसिक आरोग्य परिषदेत उमटला. ‘आदित्य बिर्ला एज्यूकेशन ट्रस्ट’ने आयोजित केलेल्या ‘बी द चेंज’ या पहिल्या मानसिक आरोग्य परिषदेत पालक-शिक्षक, मानसोपचारतज्ञ सहभागी झाले होते. ‘बौद्धिक विकासापेक्षा मुलांच्या भावनिक विकासाला अधिक महत्त्व दिले पाहिजे’, असे आदित्य बिर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका सिन्हा म्हणाल्या.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment