
रामनाथी (गोवा) – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा’, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत भावपूर्ण वातावरणात ‘सुदर्शन महायाग’ करण्यात आला. चेन्नई येथील प्रश्नज्योतिषी श्री. व्यंकट शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार या यज्ञात १८ सहस्र संख्येने पांढर्या मोहरीचे हवन करण्यात आले. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाचा संकल्प केला. यज्ञाला सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. अशोक पात्रीकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती होती. मंगलमय दीपावलीच्या पार्श्वभूमीवर चैतन्यदायी यज्ञाचा लाभ झाला, याविषयी उपस्थित साधकांनी भगवंताच्या चरणी मनोमन कृतज्ञता व्यक्त केली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !