‘समाजात सनातनची मानहानी व्हावी’, या उद्देशाने सनातनच्या नावाखाली कोणी अपकृत्ये करत असल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी त्वरित कळवून सहकार्य करा !

 

१. सनातनच्या नावाखाली केले जाणारे अपप्रकार

‘सनातनच्या नावाखाली समाजामध्ये खंडणी गोळा करणे, खोटी पावतीपुस्तके छापून त्याद्वारे अर्पण गोळा करणे, सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने अधिक किमतीला विकणे, यांसारखी दुष्कृत्ये काही समाजकंटक करत असल्याचे लक्षात आले आहे. काही जण सनातनचे नाव सांगून ‘तुम्ही पैसे दिले नाहीत, तर तुमच्यावर संकट येईल’, असे भय निर्माण करून आणि ‘पैसे दिल्यास तुम्हाला व्यावहारिक दृष्ट्या लाभ होईल’, असे प्रलोभन दाखवून लोकांकडे पैसे मागत आहेत.

 

२. ‘धन अर्पणाच्या माध्यमातून लोकांचे
सत्कार्यात योगदान व्हावे’, असा सनातनचा निरपेक्ष हेतू असणे

समाजातील लोकांकडून राष्ट्र आणि धर्म जागृतीपर कार्यासाठी अर्पण घेऊन त्यांना सत्कार्यात सहभागी करून घेणे, हा सनातनचा उद्देश आहे. काही जणांना व्यावसायिक व्यस्ततेमुळे सत्कार्यासाठी वेळ देणे शक्य नसल्यास ते स्वेच्छेने धन अर्पण करून या कार्यात योगदान देतात. धन अर्पण करण्यासाठी साधक कुणावरही बळजोरी करत नाहीत.

सनातनचा हेतू स्पष्ट आणि निःस्वार्थी असून आपल्या निरपेक्ष कार्यामुळे समाजातील अनेकांच्या मनात सनातनने विश्‍वासार्हता निर्माण केली आहे. त्यामुळे ‘समाजात सनातनची मानहानी व्हावी’, या उद्देशाने असे अपप्रकार केले जात असल्याची शक्यता आहे. असे अपप्रकार कोणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तींची माहिती आम्हाला पाठवून साहाय्य करावे, ही विनंती !’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था.

पत्ता : श्री. वीरेंद्र मराठे, ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१;

ई-मेल : [email protected]

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक : ७०५८८८५६१०

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment