सनातन संस्थेच्या वतीने धुळे येथे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

जिल्हा उपअधीक्षक सचिन हिरे आणि देवपूरचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या हस्ते उद्घाटन

पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन हिरे यांना पंचांग भेट देतांना श्री. पंकज बागुल, शेजारी पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप, श्री. किशोर अग्रवाल

धुळे – येथील आई एकविरा मंदिर परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ३० सप्टेंबर या दिवशी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि देवपूरचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. हे प्रदर्शन ८ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१. शास्त्रीय पद्धतीने नारळ कसे वाढवायचे ? हे मला सनातन संस्थेकडून शिकायला मिळाले. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीनेच नारळ वाढवले जायचे. – सचिन हिरे, पोलीस उपअधीक्षक, धुळे

२. ग्रंथ पुष्कळ प्रबोधनात्मक असून याचा लाभ जास्तीत जास्त जिज्ञासूंनी घ्यायला हवा. – संजय सानप, पोलीस निरीक्षक, देवपूर, धुळे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment