जीवनात आनंद मिळण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सौ. क्षिप्रा जुवेकर

जळगाव – दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक मनुष्याची धडपड, ही आनंद मिळावा म्हणून असते. हा आनंद केवळ साधनेनेच मिळू शकतो. साधना केल्याने जीवनात कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते; म्हणून प्रत्येक मनुष्याने साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते कोरपावली येथील श्री स्वामीनारायण मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनात बोलत होते.

सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, काळानुसार ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजपाची आवश्यकता, तसेच साधना करतांना विविध अडचणींवर मात कशी करावी ?, स्वभावातील दोष दूर करून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?’ अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. याचा लाभ ९५ जिज्ञासूंनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment