बोईसर येथील भगेरीया आस्थापनात सनातन संस्थेद्वारे गणेशभक्तांचे प्रबोधन

प्रोजेक्टरवरून माहितीपट पहातांना उपस्थित कर्मचारी

बोईसर – येथील भगेरीया आस्थापनात सनातन संस्थेद्वारे प्रवचनाचे आयोजन केले होते. या वेळी प्रोजेक्टरवरून माहितीपटही दाखवण्यात आला, तसेच कार्यक्रमस्थळी संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. या कार्यक्रमाची संपूर्ण सिद्धता श्री. गणेश भारंबे आणि त्यांचे मॅनेजर श्री. के.के. सिंग यांनी केली. ४० कर्मचार्‍यांनी याचा लाभ घेतला. हिंदूंना धर्माचे शिक्षण मिळत नाही. तशी कुठेही व्यवस्था नाही. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा हे आम्हाला ठाऊक नव्हते. सनातन संस्थेमुळे कळाले, असे मत आस्थापनाचे जनरल मॅनेजर श्री. पी.आर्. मालव यांनी व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment