श्री दुर्गादेवीचा नामजप

Article also available in :

श्री दुर्गादेवी Durga devi

श्री दुर्गादेवी

देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे. नामाचा संस्कार मनावर रूजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करतांना तसेच ते नाम ऐकतांना हे लक्षात घ्यायला हवे.

‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार कुठल्या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून विविध नामजप महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने ध्वनीमुद्रित केले आहेत. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप ध्वनीमुद्रित केले असून ते सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

हे नामजप कुणीही डाऊनलोड करून वा अन्य भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित करून प्रसारित करू नयेत.

 

सात्त्विक नामपट्टी

सात्त्विक नामपट्टी

१. नामजप म्हणण्याची गती

मनुष्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याची जप म्हणण्याची गती असते. श्री दुर्गादेवीचा नामजप मध्यम गतीचा आहे. ज्यांना हा नामजप जलद गतीने म्हणायचा आहे, त्यांनी जप म्हणण्याच्या पद्धतीने जप जलद गतीत म्हणावा; पण जप म्हणण्याची पद्धत मात्र पालटू नये. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग !’, असा साधनेचा सिद्धांत असल्याने ज्या गतीने नामजप केल्यावर तुमचा भाव अधिक प्रमाणात जागृत होतो, त्या गतीने नामजप करावा.

 

२. दोन नामजपांमधील अंतर

‘एका नामजपानंतर तोच नामजप ऐकण्यापूर्वी मध्ये किती अंतर असावे ?’, याविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘व्यक्तीच्या प्रकृतीनुसार दोन जपांमधील अंतर अधिक-उणे होऊ शकते. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे हा नामजप म्हणतांना हे अंतर आपण पालटू शकतो.’ या नामजपात सर्वसाधारण अंतर ठेवण्यात आले आहे.

सनातन संस्थेमध्ये अशा प्रकारे सूक्ष्माकडे नेणारा अभ्यास करायला शिकवले जाते. त्यामुळेच अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची प्रगती जलद गतीने होते.

 

३. ‘दुर्गा’ या शब्दाचा अर्थ

‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ या नामजपातील ‘दुर्गा’ या शब्दातील ‘द’कार हा दैत्यनाश असा अर्थ सूचित करतो. ‘दुर्गा’मधील ‘दुर्’ म्हणजे वाईट आणि ‘ग’ म्हणजे गमन करणारी, नाहीसे करणारी. वाईटाचा नाश करणारी ती दुर्गा. या नामजपात ‘स्री’ असा उच्चार करण्यात आला आहे, याचे कारण मराठीमध्ये ‘श्री’ चा उच्चार ‘स्री’ असा केला जातो तर, संस्कृतमध्ये तो ‘श्री’ असा केला जातो.

 

देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीचे सविस्तर विवेचन ‘नामसंकीर्तनयोग’ या लिंकवर उपलब्ध आहे.

येथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा नवरात्रीच्या कालावधीत श्री देवीचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते; म्हणून त्या कालावधीत ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा आणि देवीतत्त्वाचा लाभ करून घ्यावा.

‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅप डाऊनलोड करून नामजप ऐका : www.Sanatan.org/Chaitanyavani

Leave a Comment