साधकांवर मायेची पाखर घालणार्‍या, तसेच सदैव सकारात्मक आणि सहजतेने वागणार्‍या पू. (सौ.) सुनीता खेमका

प्रयागराज येथे कुंभपर्वामध्ये १६.२.२०१९ या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात झारखंड येथील सौ. सुनीता प्रदीप खेमका सनातनच्या ८४ व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका यांच्या संदर्भात साधकांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका

 

१. आदर्श सहधर्मचारिणी

१ अ. ‘पू. प्रदीप खेमका यांना सेवा आणि साधना यांत साथ देणे

‘पू. प्रदीप खेमका रुग्णाईत असतांना ‘गुरुदेवच त्यांची काळजी घेत आहेत’, असा पू. सुनीताभाभींचा भाव होता. प्रकृती ठीक झाल्यावर लगेचच पू. प्रदीपभैय्या प्रकृतीची चिंता न करता झारखंडहून प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या सेवेसाठी आले. गुरुदेवांवर असलेल्या नितांत श्रद्धेच्या बळावर पू. भाभींनीही त्यांना तेथे जाण्यापासून अडवले नाही.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे

१ आ. पू. भैय्यांची सर्वतोपरी काळजी घेणे

पू. सुनीताभाभी पू. भैय्यांची सर्वतोपरी काळजी घेतात. त्या पू. भैय्यांनी घ्यावयाची औषधेही मोजून ठेवतात. त्यामुळे त्यांनी औषधे घेतली नसल्यास पू. सुनीताभाभींच्या ते लगेच लक्षात येते. पतीशी इतकी एकरूप होणारी अशी अर्धांगिनी मी प्रथमच पाहिली.’

– कु. कृतिका खत्री, देहली

 

२. वात्सल्यभाव

२ अ. साधकांची काळजी घेणे

‘पू. सुनीताभाभी आदर्श गृहिणी आहेत. त्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्रत्येक साधकावर लक्ष ठेवतात.’

– श्री. समरपाल सिंह, कतरास, झारखंड.

२ आ. प्रेमाने समजावणार्‍या पू. सुनीताभाभी कधी ‘आई, तर कधी ‘बहीण’ वाटतात !

‘प.पू. गुरुदेव निर्गुण रूपात सगळीकडे आहेत आणि पू. प्रदीपभैय्या अन् पू. सुनीताभाभी आमच्यासाठी गुरुदेवांचे सगुण रूप आहेत. पू. सुनीताभाभी आम्हाला कधी आईसारख्या वाटतात, तर कधी बहिणीसारख्या वाटतात. त्या आम्हाला प्रेमाने समजावतात, तर कधी आवश्यकता असल्यास रागावतातही. त्यांचे आमच्या पूर्ण कुटुंबाकडे लक्ष असते. त्यांच्या रूपात कतरासमध्ये गुरुदेवच आमच्यासाठी आले आहेत.’

– अधिवक्ता संजय अग्रवाल, कतरास, झारखंड.

२ इ. पू. सुनीताभाभींचा आधार वाटणे

‘पू. भैय्या मला गुरुदेवांचेच रूप, तर पू. सुनीताभाभी मला मातेसमान वाटतात. आम्ही त्यांना आमच्या अडचणी मोकळेपणाने सांगतो. त्या आम्हाला समजावून सांगतात आणि साधनेचे दृष्टीकोन देतात. आम्हाला त्यांचा आधार वाटतो.’

– सौ. पिंकी केसरी, कतरास, झारखंड.

२ ई. साधकांना जपणे

‘पू. सुनीताभाभी सर्व साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपतात.त्यांच्या सहवासात ठेवून शिकण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता !’

श्री. शंभु गवारे, वाराणसी

 

३. सकारात्मक आणि सहजतेने वागणे

‘पू. सुनीताभाभी नेहमी सकारात्मक असतात. धनबाद येथे कोणतीही अडचण आली, तरी त्या आम्हाला त्यावरील उपाय सांगतात. त्या नेहमी सहजतेने वागतात.’

– रेणु सिंह, धनबाद 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment