एक दिवस यज्ञ केल्याने १०० यार्ड क्षेत्रात १ मासापर्यंत प्रदूषण होऊ शकत नाही ! – अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. ओम प्रकाश पांडेय

राजस्थानच्या बांसवाडा येथे २२ फेब्रुवारी या दिवशी आयोजित ‘पर्यावरण संरक्षण आणि भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करतांना अंतराळ शास्त्रज्ञ आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शास्त्रज्ञ सल्लागार राहिलेले डॉ. ओम प्रकाश पांडेय यांनी त्यांचे विचार मांडले. त्यांनी केवळ समस्या न मांडता त्यावर उपायही सांगितले.

 

१. हवन आणि यज्ञ केल्याने आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो !

‘ग्लोबल वॉर्मिंग’ आज केवळ भारतापुरतेच नव्हे, तर संपूर्ण विश्‍वासाठी एक संकटकाळ ठरले आहे. त्याला रोखण्यासाठी प्रतिवर्षी देश आणि विदेशांत विचारमंथन केले जाते. पृथ्वीची सुरक्षा करणार्‍या ‘ओझोन’च्या थरामध्ये पुष्कळ मोठे छिद्र पडले आहे. त्यामुळे ‘रेडिएशन’ थांबत नाही. त्याचा परिणाम म्हणून ‘जीका’, ‘इबोला’, ‘निपाह’, ‘स्वाईन फ्लू’, ‘डेंग्यू’, ‘चिकनगुनिया’ इत्यादी विषाणूंचा फैलाव होतो. अशा प्रकारचे विषाणू येतात आणि आजार पसरवतात. जागतिक आरोग्य संघटनेला त्यावर उपचार शोधून काढण्यास १० वर्षे लागतात. तोपर्यंत सहस्रावधी लोकांचा मृत्यू होतो, ही आजची स्थिती आहे. यावरील उपाय जागतिक आरोग्य संघटनेकडे नाही. तो केवळ भारतीय संस्कृती आणि ऋषिमुनींची परंपरा यांमध्ये अंतर्भूत आहे. हवन आणि यज्ञ केल्याने आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, हे बेंगळूरू येथे एका प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे. एक दिवस यज्ञ केल्याने १०० यार्ड क्षेत्रात १ मासापर्यंत प्रदूषण होऊ शकत नाही. आपण जेव्हा यज्ञ करतो, तेव्हा त्यामध्ये आंब्याच्या लाकडांचा उपयोग करतो. त्यातून ‘एथलिन ऑक्साईड’ वायू बाहेर पडतो. त्याच्यासमवेत ‘कोपाइल’ वायूही बाहेर येतो. त्यांच्यातील रासायनिक पालटामुळे बाहेरील वातावरण शुद्ध होते. यामध्ये आपल्याला कुठलाच त्रास होणार नाही.

 

२. गायीच्या शुद्ध तुपाचा दीप लावल्याने ‘ओझोन’च्या थराला पडलेले छिद्र बुजेल !

गायीच्या शुद्ध तुपापासून जेव्हा दीप प्रज्वलित करतो, तेव्हा त्यामधून बाहेर पडणारा ‘ओ-३’ वायू ‘ओझोन’च्या थराला पडलेले भोक बुजवण्याचे काम करतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या विषाणूंपासून आपले रक्षण होते. हे काम आपल्या घरांतील महिला करत असतात. त्या भक्तीभावातून ते करत असतात; मात्र त्यांना त्या किती मोठे कार्य करत आहेत याची कल्पना नसते. हे एक मोठे शास्त्रीय संशोधन आहे.

 

३. झाडे लावण्याचे लाभ

वड : प्राचीन काळी ऋषिमुनी शिष्यांना वडाखाली ज्ञानार्जन करत होते. त्याचा लाभ असा व्हायचा की, वडाच्या वृक्षातून ‘मॅग्नेशियम फॉस्फरस’ खाली पडतो. त्यामुळे स्मृती वाढते. स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.

पिंपळ : पिंपळाची ताजी पाने हातावर ठेवून रगडा आणि त्याचा रस प्राशन करा. जीवनात कधीच कफाचा त्रास होणार नाही.

बेल : यातून मिळणार्‍या ‘मार्लो मालेसिस’ने पचनक्रिया सुधारते.

अशोक : अशोक वृक्ष लावल्याने तणाव दूर होतो.

कडुलिंब : त्वचेचे रोग, ज्वर आणि इतर आजार होत नाहीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात