साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘मार्क्सवाद’ म्हणजे कार्ल मार्क्स यांचे तत्त्वज्ञान होय. मार्क्सवादाला ‘साम्यवाद’ असेही म्हटले जाते. मार्क्सवाद हा जगभर प्रसिद्ध आहे. तसेच जगातील अनेक देशांत मार्क्सवादावर आधारलेले राजकीय पक्ष आहेत; परंतु रशिया, चीन, व्हिएतनाम आणि इतर काही देशांत प्रमुख राजकीय पक्ष हा मार्क्सवादी आहे. साम्यवाद्यांचा इतिहास रक्तरंजित आहे, हे सर्वश्रुत आहे. भारतातही साम्यवाद चांगलाच फोफावला आहे. साम्यवादाचे दुष्परिणाम संपूर्ण विश्‍व भोगत आहे.

मार्क्सवादी, म्हणजेच साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ३१.१.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत देश-विदेशातील ८ प्रसिद्ध साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांच्या (टीप) ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

टीप – ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जिथे ‘रूप’ आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. यानुसार एखाद्या व्यक्तीच्या छायाचित्रामध्ये तिची स्पंदने विद्यमान असतात. त्यामुळे चाचणीतील व्यक्तींची (साम्यवादी नेत्यांची) (कृष्णधवल) छायाचित्रे अभ्यासासाठी निवडण्यात आली.

 

२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

२ अ. ‘साम्यवाद

ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे. या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही, म्हणजेच ‘उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असावेत’, अशी साम्यवादाची विचारसरणी असते. कामाची सर्वांत समान विभागणी, योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ इत्यादी साम्यवादी विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत. भांडवलवादाच्या प्रसारामुळे विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी साम्यवादी विचारसरणी मागे पडत गेली. आजमितीस केवळ पाच देशांत (उत्तर कोरिया, व्हिएतनाम, लाओस, चीन आणि क्युबा) साम्यवादी राज्यव्यवस्था तग धरून आहे. (संदर्भ : https://mr.wikipedia.org/s/jk) भारतातील साम्यवादाचे नेतृत्व पी.सी. जोशी, ए.के. गोपालन, बी.टी. रणदिवे, पी. सुंदरय्या यांनी केले होते.

२ आ. कार्ल मार्क्स

कार्ल मार्क्स जर्मन अर्थशास्त्रज्ञ अन् तत्त्वज्ञ होते. त्यांनी वर्ष १८४८ मध्ये कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घातला. मार्क्स यांनी स्वतः समाजवादाची स्थापना केली नसली, तरी समाजवादावर त्यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांच्या स्फोटक विचारांमुळे त्यांना पॅरिस, ब्रसेल्स आणि नंतर लंडन येथून हद्दपार करण्यात आले. त्यांनी तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी ‘दास कॅपिटल’ नावाचे पुस्तक वर्ष १८६७ मध्ये प्रसिद्ध केले.

२ इ. व्लादिमिर लेनिन

सोव्हिएत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोव्हिएत सोशॅलिस्ट बोल्शेव्हिक पार्टीचे (नंतरच्या सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. रशियात राज्यक्रांती झाल्यानंतर वर्ष १९१७ मध्ये त्यांनी सत्ता हस्तगत केली. लेनिन हे साम्यवादी विचारवंत होते. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

२ ई. जोसेफ स्टॅलिन

वर्ष १९२८ ते १९५३ पर्यंत सोव्हिएत संघाचे नेतृत्व स्टॅलिन यांच्याकडे होते. राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन यांच्या पुढाकाराने सोव्हिएत संघाची घटना तयार करण्यात आली. सोव्हिएत संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक वांशिक अन् राष्ट्रीय गटाचे वैविध्य टिकवण्याचे उत्तरदायित्व स्टॅलिन यांनी स्वीकारले. त्या घटनेप्रमाणे संपूर्ण देशावर बोल्शेविक पक्ष आणि केंद्र सरकार यांचे थेट नियंत्रण ठेवण्यात स्टॅलिन यशस्वी झाले. सहस्रो विरोधकांचे निर्दालन करणारा ‘नर-राक्षस’ असे त्यांना संबोधण्यात येत असे, तसेच दुसर्‍या महायुद्धात सोव्हिएत संघाची जी अपार हानी झाली, त्याचे कारणही स्टॅलिन यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. पक्षशुद्धी मोहिमेत सहस्रो विरोधकांना मारल्याचा आरोपही स्टॅलिन यांच्यावर आहे. देशात स्टॅलिन यांची एकछत्री हुकुमशाही राजवट होती.

२ उ. लेऑन ट्रॉटस्की

लेऑन ट्रॉटस्की हे रशियाचे मार्क्सवादी क्रांतीकारी अन् तत्त्वज्ञ होते. ते बोल्शेविक क्रांतीतील एक नेते होते. त्यांनी ‘लाल सेने’ची स्थापना केली.

२ ऊ. माओ त्से-तुंग

माओ त्से-तुंग हे चिनी साम्यवादी क्रांतीकारक राजकारणी अन् राजकीय तत्त्वज्ञ होते. ते चिनी राज्यक्रांतीचे प्रणेते होते. वर्ष १९४९ मध्ये स्थापन झालेल्या चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे प्रथम अध्यक्ष होते. वर्ष १९४९ पासून ते १९७६ पर्यंत (म्हणजे मृत्यूपर्यंत) त्यांनी देशावर एकाधिकारशाही गाजवली. मार्क्सवाद-लेनिनवाद यात माओने घातलेली सैद्धांतिक भर अन् माओची राजकीय, सैनिकी धोरणे यांना ‘माओवाद’ या संज्ञेने उल्लेखले जाते.

२ ए. पोल पॉट

पोल पॉट यांनी ‘खमेर रूज’ नामक कम्बोडियातील साम्यवादी आंदोलनाचे नेतृत्व केले. ते वर्ष १९७५ मध्ये कंबोडिया चे नेता बनले. तसेच वर्ष १९७६-१९७९ मध्ये कम्पूचिया या लोकशाही देशाचे पंतप्रधान झालेे. सत्तेत असतांना त्यांनी ‘सभ्यता पुनरुत्थान’च्या नावाखाली कृषी-सामूहीकरण लागू केले. त्या अंतर्गत शहरी लोकांना ग्रामीण भागात स्थलांतरित करून त्यांना बळजोरीने सामूहिक शेतांमध्ये काम करण्यास बाध्य केले. त्या वेळी अतिश्रम, कुपोषण, निकृष्ट आरोग्य सेवा, मृत्यूदंडाची शिक्षा यांमुळे कंबोडियाची जवळपास २१ टक्के जनता मृत पावली.

२ ऐ. प्रकाश करात

हे साम्यवादी विचारसरणीचे भारतीय राजकीय नेते आहेत. ते वर्ष २००५ पासून ते २०१५ पर्यंत ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) महासचिव होते. ते केरळ राज्याशी संबंधित आहेत.

२ ओ. सीताराम येचुरी

हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) नेते आहेत. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सचिव (जनरल सेक्रेटरी) आणि पार्टीच्या संसदीय समूहाचे नेते आहेत. १९.४.२०१५ या दिवशी त्यांना महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.’

(संदर्भ : https://mr.wikipedia.org/s/jk)

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

३ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

३ अ १. चाचणीतील साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा असणे

३ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

३ आ १. चाचणीतील साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

३ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून ती व्यक्ती वा वस्तू यांची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

३ इ १. चाचणीतील साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांची एकूण प्रभावळ

 

४. निष्कर्ष

‘साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.

 

५. साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून
वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारण

व्यक्ती जसा विचार करते, तशी तिची कृती असते. सात्त्विक व्यक्ती सदाचरणी आणि नम्र असते. याउलट असात्त्विक व्यक्ती अहंभावी असते. तीव्र अहंभाव असणार्‍या व्यक्तीमध्ये अहंचे अनेक पैलू असतात, उदा. इतरांच्या मतांचा आदर न करणे, इतरांना हीन लेखणे, वर्चस्व गाजवणे, स्वतःच्या मतावर ठाम रहाणे, मनाने करणे, स्वतःचेच खरे करणे इत्यादी. अशी व्यक्ती एखाद्या राष्ट्राची प्रमुख वा सत्ताधारी राजकीय पक्षाची प्रमुख असल्यास इतरांचे मत विचारात न घेता प्रत्येक निर्णय हुकूमशाही पद्धतीने स्वतःच घेते. अशी व्यक्ती तिच्यातील तीव्र अहंभावामुळे वाईट शक्तींच्या त्रासाला सहज बळी पडू शकते. अशी व्यक्ती वाईट शक्तींच्या त्रासाला बळी पडल्यास राष्ट्राला घातक असे निर्णय घेण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे राष्ट्र आणि जनता यांचे भवितव्य धोक्यात येते. अशा व्यक्ती राष्ट्राचे हित कसे साधू शकणार ?

साम्यवादी विचारसरणीचे नेते ‘आम्ही समाजाचा किती विचार करतो’, असे वरवर भासवत असले, तरी वस्तूस्थिती मात्र निराळी आहे. ते ‘समाजाला लाभ होईल’, अशी काही कृती वा विचार करतांना दिसत नाहीत. याउलट आजपर्यंतचा साम्यवादी नेत्यांचा रक्तरंजित इतिहास सर्वश्रुत आहे. ‘यू.टी.एस्.’ चाचणीतील साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांची प्रभावळ आढळणे, हे त्या व्यक्ती असात्त्विक असल्याचे दर्शवते. असात्त्विक व्यक्तीकडून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. असात्त्विक व्यक्तीची स्पंदने तिच्या छायाचित्रातही असतात. त्यामुळे चाचणीतील साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

येथे विशेष लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे, चाचणीतील साम्यवादी नेत्यांच्या नुसत्या कृष्णधवल छायाचित्रांतून वातावरणात दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांचे प्रक्षेपण अनुमाने १ ते २ मीटर होत असेल, तर प्रत्यक्ष त्या व्यक्तींमध्ये किती मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असेल, याची कल्पना येऊ शकते.’

– महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२८.२.२०१९)
ई-मेल : [email protected]
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment