सनातनची ग्रंथसंपदा व्यक्तिमत्त्व विकासासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक ! – विजय वडोदकर, सचिव, श्रीसिद्धिविनायक मंदिर, अकोला

ग्रंथांविषयी जाणून घेतांना १. श्री. विजय वडोदकर

अकोला– सनातनची ग्रंथसंपदा अमूल्य असून संस्कृती आणि संस्कार यांपासून दूर गेलेल्यांना व्यक्तिमत्त्व  विकासासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. साधनेचे योग्य मार्गदर्शन या ग्रंथांत असून सांप्रदायिक साधना करणार्‍यांनीही जलद मोक्षप्राप्तीसाठी हे ग्रंथ आवर्जून वाचावेत, असे उद्गार श्री. विजय वडोदकर यांनी काढले. स्थानिक जठारपेठ चौकात सनातनच्या धर्मरथाचे पूजन श्री. वडोदकर यांचे हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी धर्मरथाच्या पूजनाची संधी दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

१. श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या भक्तगणांसाठी श्रीगणपति अथर्वशीर्षाचे लघुग्रंथ श्री. वडोदकर यांनी घेतले, तसेच त्यांच्या मंदिरातील वाचनालयात ठेवण्यासाठीही निवडक मोठे ग्रंथ घेण्याचे ठरवले.

२. मंदिरासमोरील भागात त्यांनी ग्रंथप्रदर्शन लावण्यास सांगितले, तसेच तेथील सभागृहात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्याविषयीही तळमळीने सांगितले.

३. श्री. वडोदकर हे पाटबंधारे खात्यातून निवृत्त झाले असून त्यांच्याच खात्यातील परात्पर गुरु पांडे महाराज (श्री. परशराम पांडे) यांच्या समवेत ते कार्यरत होते. या वेळी परात्पर गुरु पांडे महाराजांच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment