सर्व हिंदूंना एकत्रित आणण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी केले आहे ! – स्वामी अखंडानंददास महाराज, अखंड महायोग, ऋषिकेश

डावीकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, महंत रामज्ञानीदासजी महाराज, महामंडलेश्‍वर जनार्दनहरिगिरीजी महाराज आणि दीपप्रज्वलन करतांना महंत भगीरथीजी महाराज

 

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने संत आणि हिंदुत्वनिष्ठ
संघटना यांचे प्रयागराज (कुंभनगरी) येथील हिंदू अधिवेशन

सनातनच्या माध्यमातून शैव, वैष्णव आणि इतर संप्रदाय यांचे संघटन होणे ही हिंदु राष्ट्राची नांदी !

प्रयागराज (कुंभनगरी) – आज सर्वांत मोठा प्रश्‍न आहे तो म्हणजे हिंदूंना वाचवणे, त्यांचे रक्षण करणे. केरळ येथील शबरीमला मंदिर आणि काश्मिरी हिंदू यांचा विषय आपला आहे, असे काहीजणांना वाटत नाही. हिंदू विभागले गेले आहेत. आपण असेच राहिलो, तर लवकरच अल्पसंख्यांक होऊ. कोणताही राजकीय पक्ष, न्यायव्यवस्था हिंदूंचे ऐकत नाही. आपली लोकसंख्या घटत चालली आहे, यासाठी ती वाढवली पाहिजे. धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात घेतले पाहिजे. सर्व हिंदूंना एकत्र आणण्याचे काम सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी केले आहे. त्यामुळे आपण नक्की यशस्वी होऊ, असा विश्‍वास स्वामी अखंडानंददास महाराज यांनी येथे व्यक्त केला.

प्रयागराज (कुंभनगरी) येथे ८ फेब्रुवारी या दिवशी ‘भूमा निकेतन पंडाल’ येथे आयोजित हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने संतसमाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे एक दिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. त्या वेळी स्वामी अखंडानंददास महाराज बोलत होते. या अधिवेशनाला संत, महंत, साधू, हिंदुत्वनिष्ठ, असे एकूण ९० जण उपस्थित होते. अधिवेशनाच्या प्रारंभी वाराणसी येथील दुर्गाकुंडमधील श्री धर्मसंघ शिक्षा मंडळाच्या वेदपाठशाळेतील विद्यार्थी बटू आदर्श तिवारी, अभिषेक कुमार पांडे यांनी वेदमंत्रपठण केले.

अधिवेशनामध्ये पू. नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन ऐकतांना संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ

 

१. फाळणीच्या वेळी सनातन संस्था असती, तर भारताचे
विभाजन झाले नसते ! – ह.भ.प. शाम महाराज राठोड, आळंदी, महाराष्ट्र

काश्मिरी हिंदूंची सध्याची स्थिती पहाता देशात लोकशाही कुठे आहे का, असा प्रश्‍न पडतो. लोकशाहीत देशभक्त आणि स्वातंत्र्यसैनिक यांचा अवमान केला जात आहे. सध्याच्या सरकारकडून राममंदिराची उभारणी करण्यात हलगर्जीपणा केला जात आहे, ही खेदाची गोष्ट आहे. जगात हिंदूंसाठी एकही राष्ट्र नसणे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. हिंदूंना संघटित करण्याचे महत्त्वाचे कार्य हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत आहे. हे कार्य पाहून असे वाटते की, सनातन संस्था फाळणीच्या वेळी असती, तर भारताचे तुकडे (विभाजन) झाले नसते. हिंदू अधिवेशनात मांडलेल्या सर्व प्रस्तावांना मी समर्थन देत आहे.

 

२. हिंदूंच्या भयावह स्थितीची जाणीव सनातन संस्था करून
देत आहे ! – योगी ओमनाथ महाराज, योगी महासभा, बिकानेर, राजस्थान

भारतातील मुसलमानबहुल भागात हिंदु परिवार आहे, तिथे त्यांना रहाणे पुष्कळ अवघड झाले आहे. त्यांना जपून रहावे लागत आहे; मात्र हिंदूबहुल भागात मुसलमान सुरक्षित रहात आहेत. हिंदूंच्या या भयावह स्थितीची जाणीव सनातन संस्था जनजागृती करून देत आहे. सर्वांनी आपापल्या भागांत सनातन संस्थेची शिबिरे आयोजित करून हिंदूंना जागृत केले पाहिजे. राजस्थानमध्ये कोठेही सनातनचे शिबिर घ्यायचे असल्यास आम्ही तन, मन आणि धन यांनी नेहमीच सहकार्य करू.

 

वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. हिंदु राष्ट्राविषयी अधिवेशन घेतल्याविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संतांकडून कौतुक

हिंदू अधिवेशनात बहुतांश सर्वच संतांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी १ दिवसाचे अधिवेशन घेतल्याविषयी या दोन्ही संघटनांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी येथे १ दिवसाच्या कुंभमध्ये अधिवेशनाद्वारे अमृताच्या १ थेंबापासून प्रारंभ केला आहे, असे सांगून कौतुक केले.

२. शैव, वैष्णव असे सर्व संप्रदाय आणि प्रांत येथील संतांचा अधिवेशनाद्वारे त्रिवेणी संगम

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी घेतलेल्या १ दिवसीय अधिवेशनात शैव, वैष्णव आणि इतर संप्रदाय यांसह विविध प्रांतांतील संत-महंत, साधू मोठ्या संख्येने अधिवेशनाला उपस्थित होते. जणू या अधिवेशनात विविध संतांचा गंगा, यमुना, सरस्वती नद्यांप्रमाणे त्रिवेणी संगम झाल्याचे दृश्य पहायला मिळाले. कोणताही भेदभाव न करता आणि केवळ एकच संप्रदाय न मानता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी सर्व संप्रदाय आणि प्रांत येथील संतांना एकाच व्यासपिठावर आणल्याविषयी सर्व संतांनी आनंद व्यक्त करून या दोन्ही संस्थांना पुढील कार्याला यश मिळण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी शुभाशीर्वाद दिले.

३. कुंभमेळ्यात पहिले आणि सर्व राजकीय पक्षांच्या विचारधारांचे सर्वसमावेशक अधिवेशन !

कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरीत प्रथम हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी १ दिवसीय अधिवेशन यशस्वीपणे घेण्यात आले. हे अधिवेशन म्हणजे सर्व राजकीय पक्षांच्या विचारधारांचे सर्वसमावेशक असे अधिवेशन होते.

४. संत-महंत यांचे मार्गदर्शन

पाकव्याप्त काश्मीरमधील हिंदूंचे शारदापीठ हिंदूंसाठी खुले करावे, यासाठी संघर्ष करणारे ‘सेवा शारदा पीठा’चे संस्थापक श्री. रवींद्र पंडिता यांनी चालवलेेल्या प्रयत्नांची माहिती दिली. बिकानेर येथील योगी हंसनाथ यांसह इतर संत-महंत यांनी मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment