अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५५ व्या अधिवेशनात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर), २ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५५ वे आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ४१ वे अधिवेशन २ आणि ३ फेब्रुवारी या कालावधीत श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज येथे चालू आहे. या अधिवेशनामध्ये सनातनचे ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील वाचनालयांचे प्रतिनिधी येथे असणार्‍या विविध ग्रंथ प्रदर्शनांना भेटी देतात आणि त्याप्रमाणे वाचनालयासाठी लागणार्‍या ग्रंथांची खरेदीही करतात.

मागील वर्षी भरवण्यात आलेल्या लातूर येथील ग्रंथालय अधिवेशनानंतर अनेक वाचनालयांच्या प्रतिनिधींनी सनातनचे ग्रंथ त्यांच्या वाचनालयामध्ये वाचकांसाठी उपलब्ध केले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment