सनातन संस्था करत असलेल्या धर्मकार्याची आजच्या काळात नितांत आवश्यकता ! – स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज

सनातन संस्थेच्या साधकांकडून स्वामी
गोेविंददेवगिरिजी महाराज यांची सदिच्छा भेट !

दैनिक सनातन प्रभात वाचतांना स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज

जयसिंगपूर, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – स्वामी गोेविंददेवगिरिजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास हे विघ्नहर्ता श्री गणेश ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने जयसिंगूपर येथे आले आहेत. या निमित्ताने सनातन संस्थेचे साधक श्री. अण्णासाहेब वरेकर आणि श्री. जितेंद्र राठी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. महाराजांना पुष्पहार अर्पण करून  ‘सनातन पंचांग २०१९’ भेट देण्यात आले. स्वामी गोेविंददेवगिरिजी महाराज यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून ‘‘तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करत आहात. अशा प्रकारच्या धर्मकार्याची आज आवश्यकता आहे’’, असे गौरवोद्गार काढले. स्वामी गोेविंददेवगिरिजी महाराज यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचीही अगत्याने चौकशी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात