परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविना ग्रंथप्रदर्शनाचे परिपूर्ण आणि तपशीलवार नियोजन कोणीच करू शकत नाही ! – शशिकांत ठुसे

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील परात्पर गुरु डॉक्टर
आठवले यांचे गुरुबंधू श्री. शशिकांत ठुसे यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना श्री. शशिकांत ठुसे (उजवीकडे)

नारायणगाव (जिल्हा पुणे), ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने २८ ऑक्टोबर या दिवशी धर्मरथामध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे गुरुबंधू श्री. शशिकांत ठुसे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. धर्मरथ पाहिल्यानंतर ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविना असे परिपूर्ण आणि तपशीलवार नियोजन कोणीच करू शकत नाही’, असे ते म्हणाले.

या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयीची एक आठवण सांगतांना ते म्हणाले, ‘‘एकदा दिवाळीच्या वेळी मी सर्वांना तेल लावले होते. त्यानंतर थकून मी प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या गाडीत जाऊन झोपलो. बाबांनी माझी चौकशी केल्यावर बाकीच्यांनी मी झोपलो असल्याचे सांगितले. तेव्हा बाबांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना बोलावले आणि माझा रक्तदाब मोजायला सांगितला. मी झोपेतून उठलो, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे माझा रक्तदाब मोजण्यासाठी उभे होते. त्यांनी मला झोपेतून उठवले नाही. यातून त्यांची गुर्वाज्ञापालनाची तळमळ दिसून येते.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात