त्रिचूर (केरळ) येथे सनातनच्या वतीने जिज्ञासूंना साधना आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांविषयी मार्गदर्शन

त्रिचूर (केरळ) – केरळच्या त्रिचूर जिल्ह्यात सनातनच्या वतीने जिज्ञासूंसाठी व्याख्यान घेण्यात आले. सनातन संस्थेच्या कु. रश्मी परमेश्‍वरन् आणि श्री. नंदकुमार कैमल यांनी ‘साधना, आध्यात्मिक उपाय, अध्यात्माचे महत्त्व, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व’ यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी जिज्ञासूंचे शंकानिरसन करण्यात आले. उपस्थितांपैकी बरेच जण ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या संकेतस्थळाला नियमित भेट देत असून त्यावरील मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत.

क्षणचित्रे

१. व्याख्यानाची सोप्या आणि सरळ भाषेतील मांडणी कौतुकास्पद होती. साधनेविषयी योग्य दृष्टीकोन मिळाला, असे जिज्ञासूंनी सांगितले.

२. उपस्थितांनी त्यांच्या भागात नियमित सत्संगाची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment