नगर येथे सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाच्या धर्मरथाचे पूजन

धर्मरथाचे पूजन करतांना मान्यवर

नगर – येथील गांधी मैदान येथे १ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाचा फिरता धर्मरथ लावण्यात आला होता. या धर्मरथाचे पूजन येथील महापौर सौ. सुरेखा कदम (शिवसेना) यांच्या हस्ते, तर मनसेच्या नगरसेविका विनाताई बोज्जा, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. सुरेखा विद्दे, ह.भ.प. प्रभाताई भोंग यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

१. नगर सेविका विनाताई बोज्जा : सनातन संस्थेचे काम चांगले आहे. मी कायम संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होत असते. धर्मरथाचे स्वागत करते आणि मी सर्वांना आवाहन करते की, सर्वांनी या धर्मरथाला भेट देऊन येथील ग्रंथांचे वाचन करावे. यातील माहिती पुष्कळ महत्त्वाची असून हे ग्रंथ इतरांना भेट म्हणूनही द्यावेत.

२. महापौर सौ. सुरेख कदम : आपला धर्म जपण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी सनातन संस्था काम करते. या ग्रंथामध्ये महिलांचे रक्षण कसे करायचे ?, धर्माचे रक्षण कसे करायचे? , धर्म कसा जपायचा ? याविषयीची माहिती आहे. तरी या ग्रंथांचा अधिकाधिक नगरवासियांनी लाभ घ्यावा. या धर्मरथाला शुभेच्छा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात