सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी व्यवस्थापकीय संचालक

‘गुरुतत्त्व मासिका’चा प्रथम वार्षिक सोहळा

मासिकाचे प्रकाशन करतांना मान्यवर

डोंबिवली – हिंदु धर्मात अनेक देवता आहेत, तर तुम्ही प्रथम अनेकांतून एकात या आणि कुलदेवतेचे नामस्मरण करा. अध्यात्मात त्याला ३० टक्के महत्त्व आहे. तुम्ही तुमच्यातील शिष्यत्व वाढवल्यावर गुरु तुमच्याकडे येतील. सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते, असे प्रतिपादन पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. ते एव्हरेस्ट सभागृह, डोंबिवली पश्‍चिम येथे ‘गुरुतत्त्व मासिका’च्या प्रथम वार्षिक सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना संबोधित करत होते.

समाजात अनेक संत आणि गुरु आहेत; पण त्यांच्यात असलेल्या मतभेदांमुळे त्यांची  एकजूट नाही, तर हिंदु धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्यासाठी आणि हिंदु धर्माच्या सर्व भक्तांना एकाच गुरुतत्त्वाच्या छत्राखाली आणण्याच्या उद्देशाने गुरुतत्त्व प्रतिष्ठान प्रत्येक मासाला गुरुतत्त्व मासिक प्रकाशित करते. गुरुतत्त्व मासिक आपल्या प्रत्येक अंकात एका गुरूंची माहिती देतात. या वेळी वार्षिक सोहळ्यानिमित्त सद्गुरु श्री. नारायण महाराज खेडगावकर यांच्या चरित्रावर अंक प्रकाशित करण्यात आला.

उपस्थित मान्यवर : कल्याण-डोंबिवलीच्या महापौर सौ. वनीता राणे, पत्रकार श्री. आत्माराम नाटेकर, समाजसेवक श्री. रामचंद्र परब, क्रियायोग प्रचारक श्री. अरविंद कुलकर्णी, कीर्तनकार, अभ्यासक श्री. समीर लिमये, ज्येष्ठ साहित्यिक श्री. वामनराव देशपांडे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री. गणेश कुलकर्णी, गुरुतत्व मासिकाचे प्रकाशक आणि संपादक श्री. संतोष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात