साधक-चित्रकाराने काढलेल्या भारतीय रूपातील न्यायदेवतेच्या चित्राची वैशिष्ट्ये

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट
इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘भारत देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात गेला होता. त्या वेळी त्यांनी त्यांची (कु)संस्कृती, असात्त्विक वेशभूषा-आहार, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत आदी भारतियांवर लादली. न्यायव्यवस्थाही त्याला अपवाद नव्हती. याचे दूरगामी दुष्परिणाम गत अनेक वर्षे प्रत्येक क्षेत्रात ठळकपणे दिसून येत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली, तरी इंग्रजांचा पगडा तसूभरही न्यून (कमी) झालेला नाही. सध्या प्रचलित असलेले न्यायदेवतेचे चित्र याचे प्रातिनिधिक आणि बोलके उदाहरण आहे. ‘डोळ्यांवर पट्टी बांधलेली, पाश्‍चात्त्य पोषाखातील, हातात तराजू घेऊन उभी असलेली आणि तराजूची दोन्ही पारडी समस्थितीत’, अशा रूपातील न्यायदेवतेचे चित्र सर्वत्र प्रचलित आहे. वर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-चित्रकाराने न्यायदेवतेचे भारतीय रूपातील चित्र रेखाटले होते. या चित्रातील न्यायदेवता ‘सात्त्विक पोषाख आणि मुकुटादी अलंकारांनी सुशोभित, डोळे उघडे असलेली, हातात तराजू घेतलेली; पण ज्याचे एक पारडे खाली आणि दुसरे पारडे वर आहे’, अशा रूपातील आहे. सध्या प्रचलित असलेले न्यायदेवतेचे चित्र आणि साधक-चित्रकाराने रेखाटलेले भारतीय रूपातील न्यायदेवतेचे चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी २७.५.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तर्फे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका पटलावर (टेबलावर) चाचणीसाठी ठेवायच्या चित्राला आधार देण्यासाठी पांढरा ठोकळा ठेवून तेथील वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूळ नोंद’ होय. त्यानंतर सध्या प्रचलित असलेले न्यायदेवतेचे चित्र आणि साधक-चित्रकाराने काढलेले भारतीय रूपातील न्यायदेवतेचे चित्र एकेक करून पटलावर ठेवून त्यांची ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘दोन्ही छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे समजले.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे goo.gl/tVR7Pw या दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. मूळ नोंद

मूळ नोंदीच्या प्रभावळीत (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीत) ४५ टक्के एकूण नकारात्मक स्पंदने आणि ५५ टक्के एकूण सकारात्मक स्पंदने होती.

पुढे दिलेल्या निरीक्षणांत चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

२ आ. सध्या प्रचलित असलेल्या न्यायदेवतेच्या
चित्रामुळे वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटणे

या चित्राच्या प्रभावळीत एकूण नकारात्मक स्पंदने ४९ टक्के होती आणि सकारात्मक स्पंदने ५१ टक्के होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या चित्राच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने ४ टक्क्यांनी घटली होती. या चित्राच्या प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंग ४ टक्के होता, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील पिवळ्या रंगाच्या (१९ टक्क्यांच्या) तुलनेत तो पुष्कळ घटला होता. ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत सध्या प्रचलित असलेल्या न्यायदेवतेच्या चित्रामुळे वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटले, असे यावरून लक्षात येते.

२ इ. साधक-चित्रकाराने काढलेल्या भारतीय
रूपातील न्यायदेवतेच्या चित्रामुळे वातावरणात शुद्धतेची
स्पंदने प्रक्षेपित होणे, तेथील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण
पुष्कळ वाढणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून होणे

या चित्राच्या प्रभावळीच्या संदर्भात सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ दर्शवणारी पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ७२ टक्के सकारात्मक स्पंदने आणि २८ टक्के नकारात्मक स्पंदने होती. याचा अर्थ ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत या छायाचित्राच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने १७ टक्क्यांनी वाढली होती.

२. चैतन्याचा पिवळा रंग ३८ टक्के होता, म्हणजे ‘मूळ नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (१९ टक्क्यांच्या) तुलनेत तो पुष्कळ अधिक होता.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्चस्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंग (१० टक्के) दिसत होता.

थोडक्यात, ‘मूळ नोंदी’च्या तुलनेत साधक-चित्रकाराने काढलेल्या भारतीय रूपातील न्यायदेवतेेच्या चित्रामुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित झाली, तसेच तेथील चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले, असे लक्षात येते.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. चाचणीतील निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. साधक-कलाकाराने काढलेल्या भारतीय रूपातील
न्यायदेवतेच्या चित्रामुळे वातावरणात शुद्धतेची स्पंदने प्रक्षेपित होणे
आणि तेथील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे, यांमागील कारण

वर्ष २००८ मध्ये एका पत्रकामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले न्यायदेवतेचे चित्र घेतले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुढील सूत्रे सांगितली होती.

१. न्याय करायचा, तर डोळ्यांवर पट्टी बांधून कसा करणार ? त्यासाठी डोळे उघडे हवेत, म्हणजे डोळसपणा हवा.

२. हिंदूंच्या देवता सात्त्विक पोशाखात अलंकारांसहित असतात. न्यायदेवताही तशीच हवी.

३. तराजूची दोन्ही पारडी समस्थितीत असून उपयोग नाही; कारण त्यांतील एक पारडे ‘धर्माचे’, तर दुसरे पारडे ‘अधर्माचे’ प्रतीक असते. धर्म-अधर्माच्या लढ्यात अधर्माचा नाश होतो आणि धर्माचा विजय होतो. त्यामुळे चित्रातील तराजूच्या धर्माचे पारडे ‘जड’, म्हणजे खाली असायला हवे, तर अधर्माचे पारडे ‘हलके’, म्हणजे वर असायला हवे.

त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार साधक-चित्रकाराने न्यायदेवतेचे भारतीय रूपातील चित्र काढले. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जेथे रूप असेल, तेथे त्याच्याशी संबंधित स्पंदने (शक्ती) असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे साधक-चित्रकाराने भारतीय रूपातील न्यायदेवतेचे काढलेले चित्र अतिशय सात्त्विक बनले. त्यामुळे त्यातून वातावरणात शुद्धतेची (पवित्रतेची) आणि चैतन्याची स्पंदने प्रक्षेपित झाली. हे चित्र म्हणजे ‘भावी हिंदु राष्ट्रात न्यायव्यवस्था उत्तम असेल’, याची साक्ष देते !

याउलट सध्या प्रचलित असलेल्या न्यायदेवतेच्या चित्रामुळे वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ घटणे, हे ते चित्र सात्त्विक नसल्याचे द्योतक आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्रात प्रचलित अयोग्य, अशास्त्रीय आणि अधार्मिक चालीरितींप्रमाणेच केवळ न्यायव्यवस्थेमध्येच नाही, तर तिचे प्रतिनिधित्व करणार्‍या तिच्या चित्रामध्येही पालट करायला हवेत, हे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१.६.२०१८)

ई-मेल : [email protected]

सध्या प्रचलित असलेल्या न्यायदेवतेच्या चित्रापेक्षा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-चित्रकाराने काढलेल्या भारतीय रूपातील न्यायदेवतेच्या चित्रातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, हे दर्शवणारी ‘पिप’ छायाचित्रे

सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र.२ आणि ३ यांची तुलना मुळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करताना छायाचित्रातील पटल, तसेच चित्रांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २ : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगाचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment