कोल्हापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने शिबिर पार पडले !

साधकांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर – येणारा आपत्काळ भीषण आहे. त्यात टिकून रहायचे असेल, तर ‘भक्ती’ महत्त्वाची आहे. नाम, श्रद्धा, भाव नसेल, तर ‘भक्ती’ वाढवू शकत नाही. यासाठी भावपूर्ण नामजप करून श्रद्धा वाढवायला हवी. नामजप मनापासून केल्यानंतर ‘भक्ती’ वाढेल, असे मार्गदर्शन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ३१ मे या दिवशी येथील कृष्णा सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या शिबिरात केली. शिबिराला जिल्ह्यातील ३०० साधक उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र जागृती अभियान चालू ठेवण्याच्या उद्देशाने आणि २७ जुलैला असलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जिल्ह्यातील सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचे शिबीर पार पडले. शिबिरात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ आणि गुरुपौणिमेच्या अंतर्गत ग्रंथप्रदर्शन, सामाजिक संकेतस्थळे, सनातन प्रभात नियतकालिके, अध्यात्मप्रसार, धर्मशिक्षण, स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे संगोपन अशा विविध उपक्रमांची प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देऊन साधकांचे शंकानिरसन करण्यात आले. आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी शिबिराचा उद्देश विशद केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment