एर्नाकुलम् (केरळ) जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद !

‘१ ते ११.३.२०१८ या कालावधीत एर्नाकुलम् जिल्ह्यातील मरिन ड्राइव्ह येथे आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा (इंटरनॅशनल बुक फेअर) आयोजित केला होता. सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनात अध्यात्म, देवतांची उपासना, पालकांसाठी, तसेच बालसंस्कार आदी विषयांवरील ग्रंथ होते. याला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ग्रंथप्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंना पालक आणि बालसंस्कार या विषयांवरील ग्रंथ आवडले. काहींनी सांगितले, ‘‘सनातन संस्थेचे ग्रंथ अन्य ग्रंथांपेक्षा वेगळे आहेत.’’

क्षणचित्रे

१. ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी नमस्कार करण्याची योग्य पद्धत, दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम, हस्तांदोलन करण्याऐवजी नमस्कार करण्याचे महत्त्व आदी विषयांवरील फलक लावले होते. जिज्ञासू ते उत्सुकतेने वाचत होते आणि त्यांनी त्यांचे छायाचित्रही काढले.

२. काही जण एकदा प्रदर्शनावर आल्यावर आणखी जाणून घेण्यासाठी पुन्हा काही दिवसांनी येत असत.

३. स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनाचे २ – ३ चलचित्रपट (व्हिडिओ) मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले.

४. जिज्ञासूंना संमोहनशास्त्र, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, बिंदूदाबन, विकार-निर्मूलनासाठी नामजप या विषयांवरील ग्रंथांत रूची होती.

५. काहींनी सांगितले, ‘‘सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षात काहीतरी वेगळेपणा जाणवत आहे.’’

– कु. अदिती सुखठणकर, केरळ (मे २०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment