सनातन संस्थेचे कार्य उल्लेखनीय ! – महादेव जानकर, कॅबिनेट मंत्री

श्री. महादेव जानकर (उजवीकडे) यांना गोसंवर्धनाविषयी सांगतांना श्री. विनायक बागवडे

राष्ट्रीय गो सेवा परिषदेतील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला महादेव जानकर यांची भेट !

पुणे  – येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय गो सेवा परिषदेच्या दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री श्री. महादेव जानकर यांनी सर्व गोसेवकांना गो उद्योगविषयी अवगत केले. त्यांनी तेथे लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनालाही भेट दिली. त्यांनी सनातन संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे ते म्हणाले.

सनातनने केलेल्या संशोधनाचे प्रोजेक्ट सिद्ध करून मिळाल्यास गोसंवर्धन करता येईल !

सनातन संस्थेचे साधक श्री. विनायक बागवडे यांनी विदेशी गाय आणि देशी गाय, तसेच तूप याविषयी केलेले संशोधन अन् वैज्ञानिक चाचणी यांविषयी त्यांना अवगत केले. त्या वेळी सनातनचे गोसंवर्धनाविषयीचे संशोधन पुष्कळ चांगले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, संशोधनाविषयी स्वतंत्र प्रोजेक्ट सिद्ध करून आम्हाला द्या. त्यातून आपण गोसंवर्धन करण्याचा प्रयत्न करूया. आजपर्यंत शासकीय अनुदाने नुसती लाटली गेली, त्यापेक्षा त्यांचा संपूर्ण समाजाला प्रत्यक्ष लाभ होणे अधिक महत्त्वाचे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment