वर्ष २०१८ मध्ये तिसरे महायुद्ध होईल ! – जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्टॅ्रडॉमसचे भाकीत

जगभरात हिंसा आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे हाहाकार उडणार असल्याचेही सूतोवाच !

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन आणि
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वाढत चाललेली युद्धसदृश तणावाची स्थिती

भारतातील अनेक संतांनी हे यापूर्वीच सांगितले आहे. अन्य राष्ट्रांतील शासनकर्ते अशा भाकितांचा उपयोग त्यांच्या राष्ट्रातील संभाव्य मानवी आणि वित्त हानी टाळण्यासाठी करून घेतात, तर ‘निधर्मी’ भारतात मात्र अशी भाकिते वर्तवणार्‍या संतांना खोटे ठरवण्याची अन् त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करण्याची स्पर्धा लागते ! अशाने राष्ट्राचे हित साधले जाईल कि हानी होईल ?

‘फ्रान्सचा सोळाव्या शतकातील (वर्ष १५०३-१५६६) महान भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॉमस यांची अनेक भाकिते आज शास्त्रज्ञांसाठी रहस्य बनलेली आहेत. नॉस्ट्रॅडॉमसने येणार्‍या २० शतकांमध्ये काय काय होणार आहे, याचे भविष्य ४०० वर्षांपूर्वीच सांगितले आहे. नॉस्ट्रॅडॉमस यांनी कवितेच्या साहाय्याने सांगितलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. त्यांनी वर्ष २०१८ साठीचेही भाकीत केलेले आहे. या भाकितानुसार  वर्ष २०१८ मध्ये तिसरे महायुद्ध होणार आहे.

 

वर्ष २०१८ मध्ये होणार्‍या तिसर्‍या महायुद्धाविषयीचे भाकीत

१. मृत आत्मे कबरीतून बाहेर येऊन हिंसा घडवतील !

नॉस्ट्रॅडॉमस यांनी वर्ष २०१८ साठी केलेल्या भाकितांमध्ये अत्यंत भयानक घटनांचा उल्लेख केला आहे. त्यांनी असे लिहिले आहे की, वर्ष २०१८ मध्ये मृत आत्मे कबरीमधून बाहेर येतील आणि जगभरात प्रचंड हिंसा करतील, तसेच प्रचंड मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे.

२. जगाच्या पूर्व आणि पश्‍चिम भागांतील राष्ट्रांमध्ये युद्धे होतील !

नॉस्ट्रॅडॉमस यांनी त्यांच्या ‘द प्रोफेसीज’ या पुस्तकामध्ये तिसर्‍या महायुद्धाचे भाकीत वर्तवले आहे. या वेळी विश्‍वस्तरावर मोठे पालट होण्याची शक्यता आहे. नॉस्ट्रॅडॉमसच्या मते, तिसरे महायुद्ध २ किंवा २ पेक्षा अधिक देशांमध्ये नाही, तर २ दिशा म्हणजे पूर्व आणि पश्‍चिमेकडे असणार्‍या राष्ट्रांमध्ये होईल.

सध्या पूर्व आणि पश्‍चिमेकडील देशांमध्ये मोठी उलथापालथ होत असून अनेक ठिकाणी तणावाची स्थिती आहे.

३. मानवी वंशाचा र्‍हास होईल !

अणुस्फोटाचे संग्रहीत छायाचित्र

तिसर्‍या महायुद्धानंतर मानवी वंशाचा र्‍हास होईल. केवळ तुरळक लोक युद्धानंतरच्या शांततेचा आनंद घेण्यासाठी शिल्लक रहातील. आकाशातून आगीचे गोळे धरतीवर त्राही त्राही माजवतील. लोक असाहाय्यपणे सैरभैर होतील.

सध्या उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यामध्ये तणावाची स्थिती आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन सातत्याने अण्वस्त्रांची चाचणी घेत आहे. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धाचे ढग आणखी गडद होतांना दिसत आहेत.

४. भूकंप आणि पूर यांमुळे विनाश होईल !

नॉस्ट्रॅडॉमसने वर्ष २०१८ मध्ये सहस्रो शक्तीशाली आणि विनाशकारी भूकंप होण्याचे भाकीत वर्तवले आहे. या भाकितानुसार चीनमध्ये भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती येतील आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू होईल. वर्ष २०१८ च्या हिवाळ्यामध्ये प्रशांत महासागराच्या मध्यभागामध्ये अनेक भूकंप होतील आणि ज्वालामुखी विध्वंस करील. पुरामुळे जगभरात हाहाकार माजेल. चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांना वादळांचा जोरदार तडाखा बसेल. पाऊस आणि पूर यांमुळे रशियातील लोक सर्वाधिक प्रमाणात बाधित होतील.

५. तापमानवाढीमुळे पिके जळून जातील !

‘द प्रोफेसीज’मध्ये लिहिले आहे की, राजा जंगलांची चोरी करील. आकाश पूर्णपणे उघडे पडेल. तापमानवाढीमुळे असंख्य पिके जळून जातील.

या भाकितांचा अर्थ अनेक शास्त्रज्ञांनी सूर्याशी लावला आहे. ‘ओझोन’च्या थराला छीद्र पडल्यामुळे सूर्यावर होणार्‍या स्फोटांची आग पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून विनाश करील.

६. इटलीतील महाकाय ज्वालामुखीचा स्फोट होईल !

वर्ष २०१८ मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वी संकटात सापडेल. याचा इटलीला सर्वाधिक धोका असेल. इटलीच्या संशोधकांच्या मते ‘विसुवियस’ हा एक महाकाय सक्रीय ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी वर्ष २०१८ च्या शेवटी किंवा वर्ष २०१९ च्या प्रारंभी फुटण्याची शक्यता आहे. हा ज्वालामुखी आतापर्यंत २ वेळा फुटला आहे.

७. वर्ष २०२५ नंतर निर्माण होणार्‍या शांततेचा अनुभव घेणारे तुरळक लोकच असतील !

वर्ष २०१८ मध्ये झालेल्या या घटनांमुळे संपूर्ण जग हतबल झाले असेल आणि हा विध्वंस संपण्यासाठी वर्ष २०२५ उजाडावे लागले. तिसर्‍या महायुद्धानंतर वर्ष २०२५ मध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित होईल; मात्र या शांततेचा आनंद घेण्यासाठी जगभरात तुरळक लोकच शिल्लक असतील.’

(संदर्भ : ‘दैनिक सामना’ संकेतस्थळ, १३.११.२०१७)

 

साधकांनो, आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना वाढवून ईश्‍वराचे निस्सीम भक्त बना !

‘आजच्या निधर्मी (अधर्मी) राज्यप्रणालीमुळे सध्याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्यावर अनेक संकटे ओढवली आहेत. जगभरात अनाचार आणि अनैतिकता वाढीस लागली आहे. तसेच विविध नैसर्गिक आपत्ती, युद्धसदृश स्थिती यांमध्येही वाढ होत आहे. मध्य-पूर्वेत (सिरीया, इराक आदी ठिकाणी) वाढणारे आय.एस्.आय.एस्.चे प्रस्थ, जगभरात होणारी जिहादी आतंकवादी आक्रमणे, ही सर्व उदाहरणे आपत्काळ आल्याचे द्योतक आहे. संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आपत्काळाला प्रारंभ झाला आहे आणि त्याची तीव्रता पुढील ३ – ४ वर्षे तरी वाढतच जाणार आहे.

१. आपत्काळ ओढवण्यामागील कारणमीमांसा

अतिवृष्टिः अनावृष्टिः शलभा मूषकाः शुकाः ।

स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥

– कौशिकपद्धति

अर्थ : (प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे) अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्राकर) येतात.

तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत.

२. साधना न करणारे राज्यकर्ते जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, त्यामुळे ईश्‍वराचे ‘भक्त’ बना !

इंग्लंड, फ्रान्स आदी प्रगत देशांवरील आतंकवादी आक्रमणे; चेन्नईमधील अतीवृष्टी आदी घटनांमधील मृतांचा आकडा आणि त्या आपत्तीच्या वेळी सहस्रो नागरिकांना जीवन-मृत्यूशी करावी लागलेली झुंज पहाता राज्यकर्ते साधनसामग्रीच्या संदर्भात कितीही बलवान असले, तरी ते जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, याची प्रचीती येते. याउलट कोणत्याही आपत्काळात ईश्‍वर भक्ताच्या हाकेला धावून येतो, हा इतिहास (उदा. द्रौपदीसाठी भगवान श्रीकृष्ण, भक्त प्रल्हादासाठी नृसिंह) आहे. त्यामुळे आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधकांनी साधना वाढवून ईश्‍वराचे भक्त बनणे आवश्यक आहे. त्यासाठी साधकांनी समष्टी आणि व्यष्टी साधना वाढवून भगवंताच्या अधिकाधिक अनुसंधानात रहाण्यासाठी प्रयत्न करावेत.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(टीप : वरील चौकट ही याआधी प्रसिद्ध केलेली असून या लेखानिमित्त पुनर्प्रसिद्ध करत आहोत. – संपादक)

 

नॉस्ट्रॅडॉमस यांनी वर्तवलेल्या भाकितांपैकी खरी ठरलेली काही भाकिते !

  • ‘इंग्लंडची राजकुमारी प्रिन्सेस डायनाचा मृत्यू
  • अ‍ॅडॉल्फ हिटलरची हुकूमशाही
  • दुसरे महायुद्ध
  • अणूबॉम्बचे आक्रमण
  • अमेरिकेमध्ये झालेले ९/११ चे आक्रमण
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड
  • नॉस्ट्रॅडॉमसने स्वतःच्या मृत्यूविषयी असे संकेत दिले होते की, त्यांचा मृत्यू एक टेबल आणि झोपण्याच्या ठिकाणी होईल. मृत्यूच्या एका रात्रीपूर्वी त्यांनी भाकीत केले होते की, मी उद्या रात्रीपर्यंत जिवंत रहाणार नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी नॉस्ट्रॅडॉमस हे त्यांच्या शयनकक्षातील टेबलाजवळ मृतावस्थेत आढळून आले होते.’

Leave a Comment