गडचिरोली येथे सनातन संस्थेच्या वतीने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन शिबिराचे आयोजन

मार्गदर्शन ऐकतांना शिबिरार्थी

गडचिरोली : श्री गुरुमंदिर नागपूरप्रणित प.पू. श्री विष्णूदास महाराज अध्यात्म साधना केंद्रातील साधकांसाठी ४ ऑगस्टला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सौ. मंदाकिनी डगवार यांनी सनातन संस्थेच्या वतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यात्म, सुख-दु:ख, साधना, भाव, भाववृद्धी, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शिबीराला ४० जण उपस्थित होते. दैनिक आणि साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. सुदेष्णा रोटकर यांनी शिबिराच्या आयोजनाचे दायित्व घेतले होते. सौ. रोटकर म्हणाल्या की, सर्व आध्यात्मिक मार्ग एकाच दिशेने जातात, प्रत्येक ठिकाणी ईश्वरप्राप्ती हेच ध्येय असते. सध्याच्या काळात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.

क्षणचित्र

अनेकांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी शंकानिरसनही करून घेतले. ‘शिबीर संपू नये’, असे वाटत असल्याने आणखी काही घंटे बसण्याचीही सर्वांची सिद्धता होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment