राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे यांच्याकडून सनातन संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार !

आमदार श्री. प्रवीण पोटे (बसलेले)े यांची भेट घेतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

अमरावती : राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी प्रवीण पोटे यांनी सनातन संस्था ही एकमेव खर्‍या अर्थाने आणि प्रामाणिकपणे हिंदुत्वाचे कार्य करत आहे. याचा मला आदर आहे, असे गौरवोद्गार काढले. त्यांना समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी यासाठी कोणतेही साहाय्य लागल्यास ते करण्याची सिद्धता दर्शवली. तसेच ते सनातन प्रभातचे वार्षिक वर्गणीदारसुद्धा झाले. या वेळी त्यांना सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात