सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य स्पृहणीय ! – डॉ. सुनिल कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

  • कतरास (झारखंड) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियान
  • धर्माभिमान्यांकडून हिंदू एकता दिंडीचे आयोजन
दिंडीच्या समाप्तीनंतर राष्ट्र आणि धर्मजागृतीपर घोषणा देतांना धर्माभिमानी महिला आणि पुरुष

कतरास (झारखंड) : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देशभर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनेक स्तरांवर कार्य केले जात आहे. हे प्रयत्न अत्यंत आवश्यक आणि स्पृहणीय आहेत. याचे परिणाम हिंदु राष्ट्राच्या स्वरूपात सर्वांना लवकरच पहायला मिळतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. सुनिल कुमार यांनी हिंदू एकता दिंडीच्या समारोपाच्या वेळी केले.

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांनी एकत्र येऊन कतरास येथे हिंदू एकता दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीमध्ये ११० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. दिंडीच्या समाप्तीनंतर उपस्थितांना संबोधित करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment