स्त्री आणि तिचे कौटुंबिक जीवनातील स्थान

१. कामवासना नैसर्गिक प्रेरणा असून ती प्रजोत्पादनासाठी असणे आणि तिच्यामुळे वंशपरंपरा टिकून रहाणे

manju_mandirat_jatana

कामवासना ही नैसर्गिक प्रेरणा असते. ती प्रजोत्पादनासाठी असते आणि तिच्यामुळे वंशपरंपरा टिकून रहाते. माझ्या कामवासनेची तृप्ती तर व्हायलाच हवी; परंतु संततीला सांभाळण्याचे दायित्व माझे नाही, हे म्हणणे निसर्गविरोधी आहे.

 

 

२. पिट्रीम ए. सोरोकीन त्यांच्या सेम सेक्स ऑर्डर(Same Sex Order) या पुस्तकातील स्त्रियांविषयीची काही सूत्रे

२ अ. सुसंस्कृत घरात वाढलेल्या, सालस वातावरणात जोपासलेल्या स्त्रिया समाजात नसतांनाही बुद्धीवादी संस्कृतीचा विकास होण्याचे उदाहरण मानवजातीच्या इतिहासात शोधूनही सापडणार नसणे

पिट्रीम ए. सोरोकीन त्यांच्या सेम सेक्स ऑर्डर (Same Sex Order) या पुस्तकात म्हणतात, सभ्य समाजाने लैंगिक स्वातंत्र्याला बंदिस्त करून उत्तम संस्कृती विकसित केली आहे. स्त्री पतीशी पूर्णपणे एकनिष्ठच असावी. सुसंस्कृत घरात वाढलेल्या, सालस वातावरणात जोपासलेल्या स्त्रिया समाजात नसतांनाही बुद्धीवादी संस्कृतीचा विकास होत आहे, असे उदाहरण मानवजातीच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही.

२ आ. मातृत्व जोपासण्याचे टाळणार्‍या स्त्रियांना विविध त्रासांना सामोरे जावे लागणे

१. जी स्त्री वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःला संतती होऊ देत नाही आणि मुलाचा सांभाळ करण्यापासून स्वतःची सुटका करून घेत असते, तिला निसर्गनियम डावलण्याची शिक्षा सहन करावी लागते.

२. ज्या स्त्रिया अपत्यास स्तनपान देत नाहीत, त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.

३. स्वतःला मूल होऊ न देऊन अपत्याच्या संगोपनाचे दायित्व टाळणार्‍या महिलांना मानसिक विकृती जडते. त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. लहान लहान कारणांवरून त्या भांडायला लागतात.

४. भांडणाच्या विकोपातून घटस्फोट होतो. या मताला समाजशास्त्रज्ञ पुष्टी देतात.

५. समाजाचे स्वास्थ आणि अस्तित्व पती-पत्नीच्या पवित्र संबंधांवर अवलंबून असते. हे मत सर्वसंमत आहे. कुठलाच खरा वैज्ञानिक किंवा चिंतक या सत्यास विरोध करणार नाही.

 

३. धार्मिक अधिष्ठान आणि आध्यात्मिक बैठक यांविना पती-पत्नींमध्ये पवित्र संबंध असणे अशक्य !

धार्मिक अधिष्ठान आणि आध्यात्मिक बैठक यांविना पती-पत्नींमध्ये पवित्र संबंध असणे अशक्य असते. त्यांच्या संबंधात परस्पर आदरभावना, समजूतदारपणा, सहकार्य नसेल, तर उच्च आदर्शाचे पालन होऊ शकणार नाही.

 

४. स्त्री म्हणजे जगातील पुष्कळ मोठी शक्ती असून या शक्तीच्या संपर्कात येणार्‍या पुरुषांनी दैवी गुण प्राप्त करावेत, असे समाजसेवक श्री. सानेगुरुजी यांनी सांगणे

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, बालकथाकार, थोर देशभक्त आणि समाजसेवक श्री. सानेगुरुजी त्यांच्या भारतीय संस्कृती या पुस्तकात ते म्हणतात, पती-पत्नीच्या नात्यात शुद्ध प्रेम असायला पाहिजे. स्त्री ही कुणाचीही मालमत्ता समजली जाऊ नये. तिला हृदय आणि मन असते. तिच्या स्वतःच्या भावना असतात. तिला स्वाभिमान असतो. आनंद आणि दुःख तीही उपभोगू शकते. या गोष्टी पुरुषांनी लक्षात ठेवाव्यात. स्त्री म्हणजे जगातील पुष्कळ मोठी शक्ती. या शक्तीच्या संपर्कात येणार्‍या पुरुषांनी दैवी गुण प्राप्त करावेत.

 

५. स्त्री आणि पुरुष यांच्या पवित्र संबंधातून सशक्त, सुदृढ, साहसी आणि बुद्धीवान संतती निर्माण होणे

पती-पत्नीच्या शुद्ध पवित्र प्रेमावर कुटुंबाचे सुख अवलंबून असते. त्यांच्या संबंधात आत्मसंयम आणि परोपकाराची भावना असावी. आपल्या पुराणात शिव आणि शक्ती यांच्या मीलनाची फार सुंदर वर्णने आढळतात. त्या कथांमधून आत्मसंयम कसा असावा ?, याचे दर्शन होते. त्या मीलनातून कुमार कार्तिकेय जन्माला येतो. तो माणसे आणि देव यांची दानवांच्या तावडीतून सुटका करतो. स्त्री आणि पुरुष यांच्या पवित्र संबंधातून सशक्त, सुदृढ साहसी आणि बुद्धीवान संतती निर्माण होते. – स्वामी जगदात्मानंद (अनु. : डॉ. विनय वैद्य, नागपूर) (संदर्भ : जीवन विकास, मार्च २०१३)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’