सनातन-निर्मित ग्रंथ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्यासाठी भाषांतर सेवेत साहाय्याची आवश्यकता !

विविध भारतीय भाषांचे ज्ञान असणारे साधक,
वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना गुरुसेवेची अमूल्य संधी !

१. सनातन संस्थेने प्रकाशित केलेले विविध भाषांतील ग्रंथ म्हणजे अनमोल ज्ञानामृतच !

‘ग्रंथ’ हे अध्यात्मप्रसार करण्याचे आणि चिरकाल कार्य करणारे सर्वोत्तम माध्यम आहे. अध्यात्माचे शास्त्रशुद्ध विवेचन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा सुवर्णमध्य साधून सोप्या भाषेत ज्ञान देणार्‍या अमूल्य ग्रंथसंपदेची निर्मिती सनातन संस्थेने केली आहे. हे ग्रंथ जिज्ञासूंसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहेत. ग्रंथांविषयी अनेक साधक आणि जिज्ञासू यांना आलेल्या अनुभूती म्हणजेे ग्रंथांतील चैतन्य सिद्ध करणारे एक प्रमाणपत्रच आहे.

२. विविध भारतीय भाषा अवगत असणार्‍यांना सेवेची अमूल्य संधी !

आतापर्यंत सनातन संस्थेचे काही ग्रंथ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, कन्नड, बंगाली, ओरिया, गुजराती, गुरुमुखी आणि आसामी या ११ भारतीय भाषांत, तसेच इंग्रजीतही उपलब्ध झाले आहेत. भारतभरातील सर्व जिज्ञासूंपर्यंत ग्रंथ लवकरात लवकर पोचणे आवश्यक आहे; पण इतर भाषांचे ज्ञान असणार्‍या मनुष्यबळाच्या अभावी हे कार्य संथ गतीने चालू आहे. ग्रंथनिर्मितीच्या या व्यापक कार्याला गती यावी, यासाठी वरील भाषांचे ज्ञान असणारे घरबसल्या किंवा आश्रमात राहून या सेवेत सहभागी होऊ शकतात.

३. सेवेचे स्वरूप

अ. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांतील लिखाणाचे अन्य भाषांमध्ये भाषांतर करणे

आ. ‘भाषांतरित लिखाण मूळ लिखाणानुसार आहे ना ?’, हे पडताळणे

इ. लिखाणाचे मुद्रितशोधन (‘प्रूफ रीडिंग’) करणे

४. या सेवेसाठी आवश्यक कौशल्य

अ. ‘आपण ज्या भाषेत भाषांतर करू इच्छिता’, त्या भाषेचे ज्ञान असावे. भाषेचे ज्ञान असेल; परंतु व्याकरणदृष्ट्या विशेष ज्ञान नसेल, तर त्यासंदर्भात प्रशिक्षण घ्यावे.

आ. संगणकीय ज्ञान (मराठीतील लिखाणाचे इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याच्या सेवेसाठी MsWord आणि PDF या प्रणालींचे ज्ञान हवे.)

काही दिवस आश्रमात येऊन सेवेतील बारकावे जाणून घेतल्यास घरी राहून सेवा करणे सुलभ होईल. सेवेसाठी इच्छुक असणारे साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार स्वतःची माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१

तपशील

माहिती

१. नाव
२. जिल्हा
३. संपर्क क्रमांक
४. शिक्षण
५. कोणती भाषा अवगत आहे ?
६. आश्रमात राहून कि घरबसल्या सेवा करणार ?
७. सेवेसाठी प्रतिदिन अथवा आठवड्यातून किती वेळ देऊ शकतात ?
८. संगणक आणि इंटरनेट यांची सुविधा आहे का ?’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात