भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवलेल्या काही स्थानांचे छायाचित्रात्मक दिव्यदर्शन !

गोपी रमल्या परमानंदी, श्रीहरीशी भावानुबंध अनुभवती क्षणोक्षणी ।
शिकवली सकळांस मधुराभक्ती, पदस्पर्शाने तयांच्या भूमी ही धन्य जाहली ॥

श्रीकृष्णासम सखा, गुरु, माय-बाप कोणी नाही, हे जो जाणतो, तो खरा भक्त ! भगवान श्रीकृष्णाला अनन्यपणे शरण जाणारा भक्त संसारसागरातून मुक्त होतो. श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव वाढवण्यासाठी त्याच्या दिव्य जीवनाशी निगडित गोकुळ, वृंदावन आणि द्वारका या दैवी क्षेत्रांची छायाचित्रे येथे दिली आहेत. या छायाचित्रात्मक कृतज्ञतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करूया !

जगद्गुरु श्रीकृष्ण म्हणजे साक्षात् पूर्णावतार ।
भक्ती, ज्ञान अन् कर्म यांचे परिपूर्ण भांडार ॥

गोपाळाच्या बाललीला अनुभवलेले गोकुळ !

IMG_2512_Clr
माधव कुंज गली (येथे श्रीकृष्ण त्याच्या सवंगड्यांसह लोणी चोरून आणून खाई आणि कधी कधी लपूनही बसत असे.

भगवद्भक्तीने न्हाऊन निघालेले आणि कृष्णमय झालेले तीर्थक्षेत्र : वृंदावन !

IMG_2487_Clr
मुरलीधर वाजवी मधुर बासरी । बन्सीवटात येई गोप-गोपींसह पक्षी-प्राणी ॥बन्सीवट या वडाच्या झाडाखाली श्रीकृष्ण बासरी वाजवत असे.
IMG_2411_Clr
रासलीलेचे मध्य स्थान. या ठिकाणी प्रतिदिन रात्री श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यामध्ये रासलीला होते.

श्रीहरीचे अस्तित्व अनुभवण्या या द्वारकेत !

IMG_3199_Clr
एका रात्रीत ४ वेदांचा उच्चार करून भगवान विश्‍वकर्मांनी बांधलेले भगवान श्रीकृष्णाचे ५००० वर्षे प्राचीन मंदिर
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात