
राणेबेन्नूरु (कर्नाटक) : हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आणि राष्ट्रभक्तीविषयी जनजागृती करणे, यांसाठी सनातन संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून संस्थेच्या या कार्याचे आम्ही जवळून अवलोकन केले आहे. या संस्थेकडून धर्म आणि संस्कृती यांचे कार्य पुढे होत राहो अणि त्यात त्यांना यश लाभो, ही शुभेच्छा ! भगवंताची कृपा सर्वांवर असू दे, अशी प्रार्थना करतो, असे आशीर्वचन राणेबेन्नूरु येथील श्री रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे श्री प्रकाशानंदजी महाराज यांनी सनातन संस्थेला दिले. काही हिंदु विरोधकांकडून सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेचे साधक आणि पतंजली योग समितीचे कार्यकर्ते यांनी महाराजांची भेट घेतली होती. त्या वेळी ते बोलत होते.
श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
सनातन धर्मयुगाच्या स्थापनेसाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा
भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य...
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे...
सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज...
अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !