एखाद्या गोपीत श्रीकृष्णभाव किंवा गोपीभाव असल्याचे कसे ओळखावे ?

१. श्रीकृष्णभाव असलेलाच इतरांना मिळालेला
श्रीकृष्णाचा आनंद अनुभवू शकणे आणि एखाद्या साधकात
श्रीकृष्णभाव, म्हणजेच गोपीभाव असल्यासच तो गोपी वाटणे

trupti_gavade
कु. तृप्ती गावडे

एका साधकाने विचारले, “तुम्हाला तुमच्यातील कृष्णभावामुळे सगळ्यांच्यात गोपी दिसतात कि त्यांच्यातील गोपीभावामुळे ?” मी सांगितले, आम्हाला साधकांच्या मनात असणार्‍या श्रीकृष्णाच्या ओढीमुळे ते गोपी वाटतात. त्यानंतर मनात विचार आला, श्रीकृष्णाची भक्ती करायला लागल्यावर काही जणांच्या अंतर्मनात श्रीकृष्णभाव निर्माण होतो. त्यामुळे त्यांना स्वतःला आनंद मिळतो आणि हा आनंद काही व्यक्तींना सांगितला जातो. त्यांपैकी काही गोपी तो आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण ऐकतात आणि सोडून देतात. इथे असे लक्षात आले की, ज्याच्यात श्रीकृष्णभाव आहे, तोच इतरांना मिळालेला श्रीकृष्णाचा आनंद अनुभवू शकतो. काही जणांमध्ये श्रीकृष्णभाव नसतो. त्यामुळे त्यांना श्रीकृष्णाचा आनंद अनुभवता येत नाही; म्हणून आम्हाला काही साधकांमध्येच गोपीभाव जाणवतो.

२. अंतर्मनातून श्रीकृष्णाविषयी ओढ असल्यामुळे
गोपीभाव असलेल्यांकडून स्थुलातून प्रत्येक कृती
करतांना श्रीकृष्णाचे नाव घेतले जाणे आणि याउलट
स्वतःला प्राधान्य देऊन कृती करणारे गोपी न वाटणे

Gopi_trupti-350

एखाद्या साधिकेचे विचार श्रीकृष्णाच्या गोपीसारखे असतात, उदा. ती विचारते, श्रीकृष्ण कसा दिसतो ? किंवा ती बोलतांना म्हणते, “श्रीकृष्णाने मला चांगली सूत्रे सांगितली किंवा एखादी चांगली कृती केल्यामुळे तिचे कौतुक करतांना तिला विचारले, ‘हे तुला कसे कळले ?”, तर ती म्हणते, “मला हे श्रीकृष्णाने सुचवले.” तेव्हा असे लक्षात आले की, ‘साधिकेची अंतर्मनातून श्रीकृष्णाबद्दल ओढ असल्यामुळे ती स्थुलातून प्रत्येक कृती करतांना श्रीकृष्णाचे नाव घेते. त्यामुळे ती गोपी आहे’, असे लक्षात येते. एखादी साधिका गोपी नसेल आणि तिला विचारले, ‘तू ही चांगली कृती केलीस. तुला हे कसे सुचले ?’, तर ती म्हणते, मी अमुक अमुक केल्याने मला असे सुचले. ती असेही म्हणतांना दिसते, प्रत्येक कृती मला करायची आहे. मला हे पूर्ण करून लवकर जायचे आहे. तेव्हा असे लक्षात आले की, तिथे मीपणामुळे ती साधिका श्रीकृष्णाला पूर्णपणे विसरलेली असते. त्यामुळे ती गोपी आहे, असे वाटत नाही.

– कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात