सनातन संस्थेचे कार्य आताच्या काळासाठी आवश्यक ! पू. शिवचैतन्य महाराज

kumbh_pradarshan

प्रदर्शन दाखवतांना उजवीकडे श्री. प्रवीण नाईक, त्यांच्या बाजूला
उजवीकडून  पू. शिवचैतन्य महाराज  आणि त्यांचे सहकारी

  उज्जैन, २३ एप्रिल (वार्ता.) सनातन संस्थेचे कार्य अत्यंत चांगले असून ते आताच्या काळासाठी आवश्यक आहे. धर्मावर सध्या होत असलेले आघात ही मोठी समस्या असून त्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. सध्या हिंदुत्ववादी लोकांवरच गुन्हे प्रविष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना सोडवण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संतश्री लक्ष्मण चैतन्यजी धामचे पू. शिवचैतन्य महाराज यांनी केले. जळगावमधील रावेर तालुक्यातील वृंदावन धामपाल येथे त्यांचा आश्रम आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने संप्रदायाच्या वतीने श्री हरि चैतन्य धाम या नावाने त्यांचा आखाडा उभारण्यात आला आहे.

संतश्री लक्ष्मण चैतन्यजी धाम यांच्या
वतीने सनातनला करण्यात आलेले सहकार्य

     उज्जैन येथे धर्मशिक्षण प्रदर्शनी कक्ष उभारत असतांना त्या ठिकाणी सेवेत असलेल्या ७ साधकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची सोय ८ दिवसांसाठी श्री हरि चैतन्य धाम येथे त्यांनी स्वतःहून केली होती.
     प्रदर्शन पाहिल्यावर पू. शिवचैतन्य महाराज यांनी सांगितले की, तुम्हाला साहित्य ने-आण करण्यासाठी टेम्पो अथवा इतर वाहने वापरण्यास विनामूल्य उपलब्ध करून देऊ.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात