सिंहस्थपर्वात धर्म आणि अध्यात्म केवळ सनातन संस्थेच्या प्रदर्शनात दिसले ! – स्वामी डॉ. भूमानंद सरस्वती महाराज (माजी शास्त्रज्ञ), सतना, मध्यप्रदेश

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी चर्चा करतांना स्वामी डॉ. भूमानंद सरस्वती महाराज

   उज्जैन – मी संपूर्ण सिंहस्थपर्वात फिरलो; मात्र धर्म आणि अध्यात्म केवळ सनातन संस्थेच्या प्रदर्शनात मला दिसले, असे गौरवोद्गार स्वामी डॉ. भूमानंद सरस्वती महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने लावण्यात आलेले प्रदर्शन पाहिल्यावर ते बोलत होते. सनातनच्या सर्व ग्रंथांचा संच ए.के.एस्. विद्यापिठासाठी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    महाराज निवृत्त प्राध्यापक असून त्यांनी संन्यास घेतला आहे. ते अद्यापही ए.के.एस्. विद्यापिठात एक विषय विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांनी ग्रंथप्रदर्शनातील विविध ग्रंथ खरेदी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी त्यांची अध्यात्मावर सविस्तर चर्चा झाली.

   स्वामी डॉ. भूमानंद सरस्वती महाराज पुढे म्हणाले, आपल्या संस्थेचे हिंदु संस्कृतीविषयीचे प्रदर्शन फारच छान आहे. आपल्या साधकांचा राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग आणि ते करत असलेले समाज प्रबोधनाचे सेवाकार्य पाहून मी अत्यंत प्रभावित झालो आहे. गायीच्या दुधापासून बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. एवढेच नाही, तर गोमूत्रापासून बनवलेली औषधेदेखील अनेक रोग आणि व्याधी यांवर फार परिणामकारक असल्याच्या संशोधनाविषयी मी देखील अभ्यास केला आहे. मी स्वत: शास्त्रज्ञ असून विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे, हे पटल्यावर मी अध्यात्माकडे वळलो आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात