सनातनच्या साधकाने प्रबोधन केल्यामुळे गळ्यातील क्रॉस काढून श्रीकृष्णाचे पदक घालणारा उज्जैन येथील कु. विशाल मकवाना !

     उज्जैन – येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण विषयक प्रदर्शनात उज्जैन जिल्ह्याच्या भाखाड गावातील कु. विशाल मकवाना नावाचा युवक गळ्यात क्रॉस घालून आला होता. (हिंदूंना आपल्या देवतांचे महत्त्व माहीत नसल्याने अर्थात् धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु तरुण गळ्यात क्रॉस घालण्यासारख्या कृती करतात ! – संपादक) गळ्यात क्रॉस घातल्याचे लक्षात आल्यावर सनातनचे साधक श्री. मिलींद पोशे यांनी त्याला विचारले, तू हिंदु असून खिस्त्यांचे क्रॉस असलेले पदक का घातले आहेस ? आपल्या धर्मात अनेक शूरवीर देवता आणि अवतार झाले आहेत. तुला हिंदु धर्माचा अभिमान आहे की नाही ? यावर कु. विशालसह आलेल्या दोन्ही मित्रांनी त्याला पदक काढण्यास सांगितले आणि कु. विशाल याने गळ्यातील क्रॉस काढला. नंतर त्याने प्रदर्शनातून श्रीकृष्णाचे पदक घेऊन गळ्यात घातले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात