सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष

Pradeep-Pandey_2
डावीकडून पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, श्री. प्रदीप पांडे, त्यांचे सहकारी आणि श्री. विनय पानवळकर

हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे. सिंहस्थानंतर या ज्ञानाच्या प्रसारासाठी आम्ही संस्थेच्या सहकार्याने कृती करू, असे प्रतिपादन भाजपचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप पांडे यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ कुंभक्षेत्री लावण्यात आलल्या प्रदर्शनाला भेट देण्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते ग्रंथ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

क्षणचित्र : या वेळेस त्यांच्या समवेत आलेल्या राजस्थानच्या सहकार्‍यांचाही ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.