सनातन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे ! – ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा, अध्यक्ष, जय माता दरबार, बरेली, उत्तरप्रदेश

उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री सनातन संस्था
आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन

Sadhvi-Geeta_1
साध्वी गीता मिश्रा यांना माहिती सांगताना डावीकडून डॉ. (सौ.) साधना जरळी

     उज्जैन – सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे. सनातनच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात कसे आचरण केले पाहिजे, ते शिकवले जात आहे, असे प्रतिपादन बरेली उत्तरप्रदेशच्या ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा (अध्यक्ष, जय माता दरबार) यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ क्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर त्या बोलत होत्या. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र त्यांना दाखवल्यावर त्या म्हणाल्या तुमचे गुरूंमध्ये तेज दिसते. ते अलौकिक वाटतात. त्यामुळेच सनातनचे सर्व साधक एवढे नम्र आहेत. सनातनचे कार्य वाढतच जाणार आहे, यात काहीच शंका नाही. या वेळेस सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) साधना जरळी यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती सांगितली.

क्षणचित्रे

१. सर्व प्रदर्शन बघून त्यांनी त्यांच्या शिबिरामध्ये प्रदर्शन लावण्याची इच्छा दाखवली. तसेच त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येकाला प्रदर्शन पहायला पाठवणार, असेही त्यांनी सांगितले.

२. सनातनची सात्त्विक उत्पादने दाखवल्यावर त्यांनी सात्त्विक उदबत्ती आणि कापूर घेतले, तसेच हे साहित्य अत्यंत दुर्मिळ आहे, असेही त्यांनी सांगितले.