श्री शिकारीमातेच्या पुरातन मंदिराच्या छताचे रहस्य अद्याप कायम !

अज्ञातवासात असतांना पांडवांनी बांधले होते मंदिर !

shikari_mata
श्री शिकारीमातेचे मंदिर

शिमला (हिमाचल प्रदेश) – मंडी जिल्ह्यात एका उंच शिखरावर वसलेल्या श्री शिकारीमातेच्या मंदिराचे छत बांधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; मात्र आजपर्यंत ते कुणीच बांधू शकलेले नाही. पांडवांनी अज्ञातवासात असतांना हे मंदिर बांधले होते. त्यांनी जाणूनबुजून या मंदिराचे छत बांधले नव्हते, तर मोकळ्या आकाशाखाली या मूर्तीची स्थापना केली होती.

shikari_mata_mandir

समुद्रसपाटीपासून २ सहस्र ८५० मीटर उंचीवर हे मंदिर आहे. अज्ञातवासात असतांना पांडवांनी तपश्‍चर्या केली होती. त्यानंतर देवीने प्रसन्न होऊन पांडवांना युद्धात कौरवांचा पराभव करून विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता. तेथून निघतांना पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती, असे सांगितले जाते. या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते. या ठिकाणी अनेक शिकारी रहायचे. शिकारीला निघण्यापूर्वी ते देवीला प्रार्थना करायचे आणि त्यांना यात यशही मिळायचे. तेव्हापासून या मंदिराला शिकारीमातेचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात